पुणे: मांजरींना क्रूरतेची वागणूक देणा-या महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:51 AM2017-08-03T02:51:33+5:302017-08-03T02:52:09+5:30
घरातील पाळीव प्राण्यांना क्रूरतेची वागणूक दिल्याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेला कोंढवा पोलिसांनी अटक केली. आरोपी महिला महंमदवाडी येथील गंगा किंगस्टन प्लँटमध्ये राहते.
कोंढवा : घरातील पाळीव प्राण्यांना क्रूरतेची वागणूक दिल्याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेला कोंढवा पोलिसांनी अटक केली. आरोपी महिला महंमदवाडी येथील गंगा किंगस्टन प्लँटमध्ये राहते. तिच्याविरूद्ध ४७ वर्षीय समाजसेविकेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेकडे दोन पर्शियन मांजरे आणि एक सेंट बर्नाड जातीचे कुत्रे आहे.
पाळीव प्राण्यांची व्यवस्थितपणे देखभाल करणे गरजेचे असताना तिने आपल्या पाळीव प्राण्यांना अरूंद जागेत गळ्याला चेन बांधून २७ ते ३० जुलै असे तब्बल तीन दिवस अन्न पाण्यावाचून तळमळत ठेवून त्यांना यातना होतील असे कृत्य केले. तसेच घरामध्ये कासव पाळण्यास मनाई असूनही परवाना नसताना तिने ती घरात ठेवली.
याप्रकरणी प्राण्यांना क्रुरतेने वागण्यापासूनचा प्रतिबंधक कायदा 11 (1)(एच) आणि वन्यजीव संरक्षण कायदा 2 (16),51 याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए.एम सोनावणे पुढील तपास करीत आहेत.