‘आयटी’तल्या तरुणाईची निवासासाठी पुण्याला पसंती

By admin | Published: August 24, 2015 03:01 AM2015-08-24T03:01:09+5:302015-08-24T03:01:09+5:30

विद्येच्या माहेरघरात येऊन शिकण्यासाठी जसे देशभरातील विद्यार्थी इच्छुक असतात आता तसेच चित्र आयटीक्षेत्राबाबतही दिसून येत आहे. बेंगलोर, चेन्नईच्या तुलनेत स्वस्त

Pune's preferred choice for the youth of IT | ‘आयटी’तल्या तरुणाईची निवासासाठी पुण्याला पसंती

‘आयटी’तल्या तरुणाईची निवासासाठी पुण्याला पसंती

Next

पुणे : विद्येच्या माहेरघरात येऊन शिकण्यासाठी जसे देशभरातील विद्यार्थी इच्छुक असतात आता तसेच चित्र आयटीक्षेत्राबाबतही दिसून येत आहे. बेंगलोर, चेन्नईच्या तुलनेत स्वस्त घरे, उत्तम हवामान आणि आवश्यक सुविधा यांमुळे आयटीकरांची पहिली पसंती पुणे शहरालाच मिळत असल्याचे नॅसकॉमच्या एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (नॅसकॉम) या आयटी क्षेत्रातील शिखर संस्थेने एटी करनी या नावाने सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद यांसारख्या मेट्रो शहरांच्या तुलनेत पुणे हे राहण्याच्या दृष्टीने १० ते ११ टक्क्यांनी स्वस्त आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण पुण्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे, असे म्हटले आहे.
पुण्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून स्थायिक झालेले वैभव म्हात्रे हे आयटीक्षेत्रातील तंत्रज्ञ म्हणाले, सुरुवातीला मी काही काळ चेन्नईमध्ये स्थित होतो. त्यानंतर मला लग्न करून राहण्यासाठी एक जागा हवी होती. परंतु जेव्हा अन्य शहरांची पुण्याशी तुलना केली तेव्हा पुणे हे इतर आयटी शहरांच्या तुलनेत अजूनतरी स्वस्त असल्याचे दिसले. त्यामुळे मी या शहराला प्राधान्य दिले.
सॉफ्टवेअर आयटी पार्कमध्ये एका मोठ्या कंपनीत कार्यरत असणारे राकेश वैद्य म्हणाले, माझी पुण्यात बदली झाली तेव्हापासून मला आता दुसऱ्या शहरात जावेसे वाटत नाही. इथल्या वातावरणाशी मी जुळलो आहे.
पुण्यात परदेशी आणि भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या आयटी कंपन्यांचा वेगाने विस्तार होत आहे. गेल्या वर्षभरात पुण्यात आयटी क्षेत्रात ५ - ६ मोठ्या परदेशी कंपन्यांनी बस्तान बसवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pune's preferred choice for the youth of IT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.