उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई; दीड हजार नागरिकांकडून ३२ लाख दंड वसूल

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 24, 2023 02:31 PM2023-11-24T14:31:34+5:302023-11-24T14:34:15+5:30

गेल्या आठ महिन्यांत बेशिस्त १ हजार ५४२ नागरिक व आस्थापनांकडून एकूण ३४ लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल

Punitive action against one and a half thousand unruly citizens who throw garbage in the open | उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई; दीड हजार नागरिकांकडून ३२ लाख दंड वसूल

उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई; दीड हजार नागरिकांकडून ३२ लाख दंड वसूल

पिंपरी : कचरा उघड्यावर टाकणे, जाळणे, विलगीकरण न करणे, रस्त्यावर थुंकणे आदी प्रकार करणाऱ्या बेशिस्त नागरिक व विक्रेत्यांवर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या आठ महिन्यांत बेशिस्त १ हजार ५४२ नागरिक व आस्थापनांकडून एकूण ३४ लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आरोग्य विभागाकडून जागेवर दंड केला जातो. शहरात १६ ऑगस्ट २०२९ पासून बेशिस्त नागरिक व आस्थापनांना दंड करण्यात येत आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय आरोग्य पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे. एक एप्रिल ते २० नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण १ हजार ५४२ व्यक्ती व आस्थापनांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण ३४ लाख २२ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक कारवाई

अ क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने सर्वाधिक ३९९ जागांवर कारवाई करीत एकूण ७ लाख ९९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, ड क्षेत्रीय कार्यालयाने ३०७ जणांवर कारवाई करीत ८ लाख ७५ हजार ३०० रुपयांचा दंड जमा केला. फ क्षेत्रीय कार्यालयाने २३१ जणांकडून ५ लाख १९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. ई क्षेत्रीय कार्यालयाने १९५ जणांकडून ३ लाख ४९ हजार ३००, ग क्षेत्रीय कार्यालयाने २२२ जणांकडून ३ लाख ५ हजार ३००, ब क्षेत्रीय कार्यालयाने ६५ जणांकडून ३ लाख २ हजार ४००, क क्षेत्रीय कार्यालयाने ८५ जणांकडून १ लाख ५१ हजार २०० आणि ह क्षेत्रीय कार्यालयाने ३८ जणांकडून १ लाख २० हजारांचा दंड वसुल केला.

उघड्यावर राडारोडा टाकू नका

नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करावे. ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा. उघड्यावर कचरा व राडारोडा टाकू नये. रस्त्यांवर थुंकू नये. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे. - यशवंत डांगे, सहायक आयुक्त, महापालिका

Web Title: Punitive action against one and a half thousand unruly citizens who throw garbage in the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.