उद्योगनगरीत वाहन खरेदीसाठी झुंबड, साठ टक्क्यांनी वाढली विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 04:40 AM2017-09-26T04:40:04+5:302017-09-26T04:40:50+5:30

साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणजे दसरा. या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीला अनेकजण प्राधान्य देतात. नवीन वाहनखरेदीकडे अनेकांचा कल असतो. शहरातही नवीन वाहन खरेदीसाठी शोरूममध्ये झुंबड उडाल्याचे चित्र दिसत आहे.

For the purchase of Udyogar, the stock has increased by 60% | उद्योगनगरीत वाहन खरेदीसाठी झुंबड, साठ टक्क्यांनी वाढली विक्री

उद्योगनगरीत वाहन खरेदीसाठी झुंबड, साठ टक्क्यांनी वाढली विक्री

Next

पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण म्हणजे दसरा. या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीला अनेकजण प्राधान्य देतात. नवीन वाहनखरेदीकडे अनेकांचा कल असतो. शहरातही नवीन वाहन खरेदीसाठी शोरूममध्ये झुंबड उडाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या वाहनांची विक्री ६० टक्क्यांनी वाढली असल्याचे विक्रत्यांचे म्हणणे आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला वाहनाची गरज भासत आहे. त्यामुळे वाहन वापरणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकी वाहनखरेदी करणाºयांची संख्या अधिक आहे. दरम्यान, नवीन वाहन घेण्यासाठी चांगला मुहूर्त शोधला जातो. अशातच सध्या नवरात्र सुरू असल्याने वाहनाचे बुकिंग करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र शहरातील शोरुममध्ये पाहायला मिळत आहे.
शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी अनेक ग्राहकांनी शोरूमला भेट देत वाहन बुक केले. जीएसटी लागू झाल्यामुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे. पितृपंधरवड्यानंतर वाहन नोंदणीच्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या चार दिवसांत ५० ते ६० टक्क्यांनी वाहनांची नोंदणी वाढली असल्याची माहिती विक्रते गणेश निकम यांनी दिली.

सणानिमित्ताने खास आॅफर
आपल्या कंपनीचे वाहन कशाप्रकारे योग्य आहे याबाबत माहिती कंपन्यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचविली जात आहे. यासह विविध आॅफरही देऊ केल्या आहेत. नवीन वाहन घेणाºया ग्राहकाचे चांगल्या प्रकारे स्वागत करून नवीन वाहनाची पूजा करण्याची व्यवस्थाही शोरूममार्फत केली आहे.

बँकांकडून जागेवर कर्जाची सुविधा
सामान्य माणसाला वाहन खरेदी करणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांसाठी विविध बँकांकडून कर्ज देण्याच्या आॅफर दिल्या जात आहेत. ठरावीक कागदपत्रे जमा केल्यानंतर कर्ज उपलब्ध होत असून, यामुळे वाहन घेण्याचे स्वप्न साकार होत आहे. सध्या शहरातील विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये वाहन खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

Web Title: For the purchase of Udyogar, the stock has increased by 60%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.