‘पाचशे’साठी ठेवले डांबून

By Admin | Published: April 29, 2017 04:09 AM2017-04-29T04:09:52+5:302017-04-29T04:09:52+5:30

येथील जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाटा येथे असलेल्या कामशेत हॉस्पिटलमध्ये एका गरीब घरातील रुग्णावर प्राथमिक

Put it for five hundred | ‘पाचशे’साठी ठेवले डांबून

‘पाचशे’साठी ठेवले डांबून

googlenewsNext

कामशेत : येथील जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पवनानगर फाटा येथे असलेल्या कामशेत हॉस्पिटलमध्ये एका गरीब घरातील रुग्णावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सोडण्याआधी भरमसाट बिल त्याच्या हाती देण्यात आले. एवढे बिल भरण्याची ऐपत नसल्याने त्यांनी बिल कमी करण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत कमी केलेले बिल रुग्णाच्या मित्रांनी आपापसात पैसे गोळा केले़; पण ५०० रुपये कमी पडले. सर्वांनी मिळून डॉक्टरांना विनंती केली. पण, त्यांचे काहीही ऐकून न घेता रुग्ण, त्याची आई व मित्र यांना हॉस्पिटलमध्ये कोंडून ठेवून पूर्ण पैसे भरल्याशिवाय सोडणार नाही, अशी तंबी दिली.
सामाजिक कार्यकर्ते सतीश इंगवले हे रुग्ण, त्याचे नातेवाईक यांना सोडवण्यासाठी गेले असता डॉक्टरांना विनंती केली. पण, संबंधित डॉक्टरांनी अरेरावीची भाषा केली. तुमच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करतो, असे सांगून हॉस्पिटलच्या बाहेर काढण्यात आले, असे इंगवले यांनी सांगितले. रुग्ण शहनाबाद अन्सारी, त्याची आई, मित्र अभिषेक इंगवले, वैभव थोरात, शुभम कांबळे व सुशील गरुड आदींना हॉस्पिटलच्या एका खोलीमध्ये डांबून बाहेरून कुलूप लावण्यात आल्याचा आरोप रुग्ण व त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.
घरात पडल्याने १६ वर्षीय शहनाबाद अन्सारी याचा हात फ्रॅक्चर होता. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्याने शहनाबादच्या मित्रांनी उपचारासाठी आपल्या पॉकेटमनीमधून पैसे गोळा केले होते. त्याच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. शहनाबादवर हॉस्पिटलमध्ये तासभर उपचार करुन ५२०० रुपयांचे बिल देण्यात आले होते. ते कमी करण्यात आले. पण, मित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धावपळ करुन पैसे जमा करुनही ५०० रुपये कमी पडत होते. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे म्हणाले, हा प्रकार खूपच निंदनीय असून डॉक्टर लोकांनी माणुसकी व वैद्यकीय सेवेचा सकारात्मक विचार करून तसे वागायला हवे.
कामशेतचे उपसरपंच गणपत शिंदे म्हणाले की, या हॉस्पिटलची अनेकदा तक्रार आली असून, रुग्णांना बिलावरून त्रास दिला जातो. अशा हॉस्पिटल व डॉक्टर यांच्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी. जर कारवाई झाली नाही, तर उपोषणाला बसणार आहे.
संबंधित रुग्णाचे वैद्यकीय बिल ५२०० झाले होते. पण, त्याची आर्थिक परिस्थिती पाहता आम्ही बिल कमी करून त्यांना ३५०० रुपये भरण्यासाठी सांगितले. पण, ते पैसे भरणार नाही असे बोलून अरेरावीची भाषा केली. त्याच प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते इंगवले व इतर अनेक जण आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून गेट बंद केले होते. स्थानिक नागरिकांकडून नेहमीच बिलाच्या बाबतीत त्रास होत असून, वैद्यकीय क्षेत्राचा मान राखला जात नाही, असे कामशेत हॉस्पिटलचे डॉ. एकनाथ गोपाळघरे यांनी सांगितले.(वार्ताहर)

Web Title: Put it for five hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.