भांडणाने संपत्तीचे मालक होता येत नाही
By admin | Published: January 28, 2017 12:16 AM2017-01-28T00:16:22+5:302017-01-28T00:16:37+5:30
साधना करणे सोपे नाही. साधनेशिवाय काहीच कळत नाही. परमेश्वर संताना कळला आहे. आयुष्यात जबाबदारी पाळतात त्याच ठिकाणी
किवळे : साधना करणे सोपे नाही. साधनेशिवाय काहीच कळत नाही. परमेश्वर संताना कळला आहे. आयुष्यात जबाबदारी पाळतात त्याच ठिकाणी सत्पुरुष जन्माला येतात. माता पिता श्रेष्ठ आहेत. साधुसंतांचे अंत:करण मोठे असते. प्रत्येकाच्या अंगी नम्रता हवी. भांडणे करून संपत्तीचे मालक होता येत नाही याचे भान ठेवा, असे प्रतिपादन हभप आसाराम बढे यांनी केले.
समस्त रावेत ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री धर्मराज महाराज उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताहातील कीर्तनात बढेमहाराज बोलत होते. यावेळी घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष मुकुंद राऊत, सुरेश पारखी, सजन दांगट, सीताराम चौरे, हभप प्रकाश भोंडवे, हभप तुकाराम सोनटक्के आदी उपस्थित होते. कीर्तनाला हार्मोनियम साथ हभप पांडुरंग दातार, गायनसाथ हभप सुखदेवमहाराज बुचडे, गणेशमहाराज मोहिते, सोमनाथ पाडाळे ,हभप परकाळे, बळवंत जाधव यांनी केली. पखवाज साथ हभप उद्धव गोळे व माउली देशमुख यांनी केली. बढे महाराजांचा सत्कार हभप किसनआबा पाडाळे यांच्या हस्ते करण्यात आला. हभप विजय भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले.
सप्ताहात हभप नितीनमहाराज काकडे, हभप बळवंत आवटी, बाळकृष्णमहाराज कुलकर्णी, चंद्रकांतमहाराज वांजळे, सुभाषमहाराज सूर्यवंशी, हभप पुरुषोत्तममहाराज पाटील यांची कीर्तने झाली. (वार्ताहर)