पिंपरीच्या महापौरपदी राहुल जाधव, उपमहापौरपदी सचिन चिंचवडे ; शनिवारी होणार शिक्कामोर्तब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 05:01 PM2018-07-31T17:01:07+5:302018-07-31T17:04:07+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी  आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.

Rahul Jadhav Mayor of Pimpri, Sachin Chinchwade as Deputy Mayor; Will be declare on Saturday | पिंपरीच्या महापौरपदी राहुल जाधव, उपमहापौरपदी सचिन चिंचवडे ; शनिवारी होणार शिक्कामोर्तब 

पिंपरीच्या महापौरपदी राहुल जाधव, उपमहापौरपदी सचिन चिंचवडे ; शनिवारी होणार शिक्कामोर्तब 

Next
ठळक मुद्देशनिवारी(दि. ४ ऑगस्ट ) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विशेष महासभेचे आयोजन

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातील नगरसेवक सचिन चिंचवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असून शनिवारी होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी  आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करायचे होते. यावेळेत सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक सचिन चिंचवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. 
शनिवारी(दि. ४ ऑगस्ट ) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे, कामकाज पाहणार आहेत. 
..............................
असे आहे महापालिकेतील पक्षीय बलाबल!
भारतीय जनता पक्ष ७७, राष्ट्रवादी काँग्रेस ३६, शिवसेना ९, अपक्ष ५ आणि मनसे १ असे १२८ नगरसेवक आहेत. यापैकी अपक्ष पाच नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 

Web Title: Rahul Jadhav Mayor of Pimpri, Sachin Chinchwade as Deputy Mayor; Will be declare on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.