पिंपरीतील देहूगावात जुगार अड्ड्यावर छापा; ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 03:31 PM2021-06-01T15:31:13+5:302021-06-01T15:31:19+5:30
बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी: जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ८२ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हगवणे आळी, देहूगाव येथे सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलिसाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
जुगार अड्ड्याचा चालक व मालक देविदास जयदेव हगवणे (वय ५२), आदिनाथ सदाशिव गायकवाड (वय ४०), उमेश संभाजी कुमार (वय ३८), सचिन गोपाळ हगवणे (वय ४२), संजय सीताराम पचपिंड (वय ५०), अफजल सौकत मुलानी (वय ३०), कृष्णकांत चंद्रकांत मोरे (वय ६५), संदीप रंगानाथ आढाव (वय ३५), केशव मारोती पचपिंड (वय ६२), तुकाराम शंकर चव्हाण (वय ४७), शाबान हसन शेख (वय ४२, सर्व रा. देहूगाव), परमेश्वर श्रीराम गाडे (वय ३२, रा. वडाचा मळा, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संतोष मारुती बर्गे यांनी याप्रकरणी सोमवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास हगवणे याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर पत्र्याच्या रूममध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी सर्व आरोपी रमी जुगार खेळताना दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी ८२ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.