हिंजवडीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायावर छापा; महिलेची सुटका, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:16 AM2021-06-10T11:16:04+5:302021-06-10T11:16:38+5:30
म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती।
पिंपरी : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. छापा मारून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तसेच एका महिलेची सुटका केली. हिंजवडीपोलिसांनी बुधवारी (दि. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास म्हाळुंगे येथे ही कारवाई केली.
सुनास रचन मसी (वय ३४, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एका महिलेची सुटका केली. या महिलेकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.