रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेआठ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 04:52 PM2021-11-16T16:52:03+5:302021-11-16T16:55:19+5:30
फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली.
पिंपरी :रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला आहे. एंजल ब्युटी पार्लर, आकुर्डी येथे ३ ते ९ सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली.
संजीवनी नीलेश पाटणे (वय २५, रा. पुनावळे), असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुमित्रा सुशील हुले (वय ३२, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी करते, असे संजीवनी पाटणे या महिलेने फिर्यादीला सांगितले. फिर्यादी आणि त्यांच्या भावाला रेल्वेमध्ये टीसी म्हणून नोकरी लावते, असे सांगून विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी संजीवनी हिने फिर्यादीकडून साडेआठ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादिस व त्यांच्या भावाला नोकरी न लावता फसवणूक केली.