कामशेत येथील रेल्वे ट्रॅक बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:07 AM2018-04-07T03:07:17+5:302018-04-07T03:07:17+5:30

कामशेत रेल्वे स्टेशन वर पुणे बाजूकडे जाणारा प्लॅटफॉर्मच्या बाजूने इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत असून, फलाट सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी मोठा खड्डा असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

A railway track in Kamlesh became tracked by the death trap | कामशेत येथील रेल्वे ट्रॅक बनला मृत्यूचा सापळा

कामशेत येथील रेल्वे ट्रॅक बनला मृत्यूचा सापळा

Next

कामशेत - येथील कामशेत रेल्वे स्टेशन वर पुणे बाजूकडे जाणारा प्लॅटफॉर्मच्या बाजूने इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत असून, फलाट सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी मोठा खड्डा असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पाठीमागून फास्ट ट्रेन आल्याने रेल्वे रुळाच्या बाजूला झालेल्या युवतीचा पाय घसरून ती खाली खड्ड्यात पडली यात डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
कामशेत रेल्वे स्टेशन पुणे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असेल जेथे रेल्वे स्टेशनच्या लगत इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत आहे. नदीच्या पलीकडे शेती तर अलीकडे रेल्वे स्टेशन शिवाय महामार्गाला जोडणारा रस्ता हा लोहमार्गाच्या दुसऱ्या बाजूने जात असून हे विहंगम टिपण्यासाठी अनेक पर्यटक येथे आवर्जून थांबतात.
याच फलाटावर सुरुवातीच्या भागात ही अशीच परिस्थिती असून शेजारीच नदीवर घाट आहे. येथे अनेक महिला व इतर जन धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडून कपडे धुण्यासाठी तसेच अंघोळीसाठी येत असतात.
यातूनच अनेक अपघात घडत असून हमालीचे काम करणारा व पिंपरी-चिंचवड रेल्वे स्टेशनवर राहणारा संतोष पाटील (वय २५) हा मागील महिन्यात मंगळवार दि. २७ या घाटावर अंघोळीसाठी आला होता. अंघोळी दरम्यान पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या लोहमार्गापैकी एक असलेला कामशेत रेल्वे स्टेशनवरून रोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. येथे प्रवाशांच्या सोयीसुविधा सह सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव आहे. रेल्वे ट्रॅक वरून जाणाºया प्रवासी यांना आळा घालणे रेल्वे प्रशासनाला शक्य नसले तरी फलाटाच्या शेवटी नदी किनारी असलेला मोठा उतार व खड्डा हा भरल्यास प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश येईल. फक्त प्रवाशांचीच चूक असते असे नसून रेल्वे प्रशासनाचीही चूक असते आणि ती त्यांनी सुधारली पाहिजे. ज्या भागातून रेल्वे रूळ ओलांडणे अथवा बाजूने वेळ वाचवण्यासाठी प्रवास करणे पसंत करतात. तेथे सुरक्षेच्या दृष्टीने जास्त उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत अनेक प्रवासी व्यक्त करीत आहेत.
याच फलाटावर सुरुवातीच्या भागात ही अशीच परिस्थिती असून, शेजारीच नदीवर घाट आहे. येथे अनेक महिला व इतर नागरिक धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडून कपडे धुण्यासाठी तसेच अंघोळीसाठी येत असतात. यातूनच अनेक अपघात घडत आहेत.
कामशेत स्टेशनवरील नुकतेच दुसºया फलाटाची उंची वाढवण्यात आली आहे. मात्र पुण्याकडे जाणाºया व नदीच्या लगत असणाºया कामशेत रेल्वे फलाटाची उंची कमी आहे. याशिवाय हा फलाट जिथे संपतो त्या ठिकाणी रेल्वे रुळाच्या बाजूला मोठा उतार व खड्डा असल्याने बाजूलाच नदी असल्याने रेल्वे गाडी पकडण्याच्या नादात अनेक जण रेल्वे रूळाच्या कडेने जाताना खडीवरून घसरून खाली खड्डयात पडून किरकोळ अपघात घडतात. तर मागून आलेल्या ट्रेनचा धक्का लागून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच तळेगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्येही धोकादायकरित्या मार्ग ओलांडला जातो. याचा त्रास प्रवाशांना होतो. अनेकवेळेला लोहमार्ग ओलांडताना अपघात झाले आहेत. तरीही धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. तसेच या ठिकाणी तिकीट घेण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे धावत पळत रेल्वे पकडण्याच्या नादात अपघातही होत आहे.
चोरट्यांची वाढली संख्या
तळेगाव दाभाडे : रेल्वेमध्ये पाकीटमारीच्या घटनाही मोठ्याप्रमाणात घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणे गरजेचे आहे. पण पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नाही. अनेकवेळा चोरी होऊन तक्रार नेमकी कोणाकडे नोंदवायची असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडत आहे. हद्दीवरून वाद होऊन तक्रार घेण्यास रेल्वे पोलीस टाळाटाळ करत असल्याने प्रवासी तक्रारही नोंदवत नाहीत.

शॉर्टकटचा वापर : अनेकांच्या जीवावर बेततोय

महामार्गावरून कामशेतकडे येणाºया रस्त्याने अनेक रेल्वे प्रवासी या भागात रेल्वे रूळ ओलांडत असून एका इंजिनिअरिंग कॉलेज सह, शाळेतील विद्यार्थी, नोकरदार वर्ग, स्थानिक नागरिक हे या रस्त्याने पायी आल्यानंतर शॉर्टकटसाठी या रेल्वे रुळावरून प्रवास करतात. मागील वर्षी येथे इंजिनिअरिंग कॉलेजच्या तरुणाचा रेल्वेगाडीच्या धडकेत मृत्यू झाला तर रविवार दि. १ रोजी पुणे येथे शिक्षण घेणारी व होस्टेलला राहणारी स्नेहल मोहन कीर्तीकर (वय २४, रा. निपाणी, बेळगाव) ही कामशेत जवळील पिंपलोळी गावात राहणाºया मैत्रिणीच्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी पाच ते सहा मैत्रिणींसह आली होती. वाढदिवस साजरा करून दुसºया दिवशी साडे आठची लोकल सुटू नये म्हणून रेल्वे ट्रॅकने चालल्या होत्या, मात्र रेल्वे किलोमीटर नंबर १४३/२४ जवळ मागून येणाºया एक्स्प्रेस गाडीचा आवाज ऐकून त्या दचकल्या स्नेहल बाजूला पळताना तिचा पाय घसरला व ती शेजारीच असलेल्या इंद्रायणी नदीच्या उतारावर पडून रेल्वेचे जागोजागी पडलेल्या स्लीपरवर डोके आदळून डोक्याला जबर मार लागून मृत्युमुखी पडली.

Web Title: A railway track in Kamlesh became tracked by the death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.