उपसूचनांचा पडणार पाऊस; सर्वसाधारण सभेत आज होणार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:00 AM2018-03-20T03:00:53+5:302018-03-20T03:00:53+5:30

महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत चर्चा होणार की नाही याबाबत उत्सुकता असताना विकासकामे घुसडविण्यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अनेक उपसूचना दिल्या आहेत.

 Rain falls; Discussion will be held today at the general meeting | उपसूचनांचा पडणार पाऊस; सर्वसाधारण सभेत आज होणार चर्चा

उपसूचनांचा पडणार पाऊस; सर्वसाधारण सभेत आज होणार चर्चा

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत चर्चा होणार की नाही याबाबत उत्सुकता असताना विकासकामे घुसडविण्यासाठी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अनेक उपसूचना दिल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या उपसूचनांचा पाऊस पडला असून, उपसूचना स्वीकारणार की नाही, याविषयी उत्सुकता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा मूळ ३५०० कोटी, तर जेएनएनयूआरएमसह ५२३५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत उपसूचनांद्वारे २७ कोटी रुपयांची वाढ केली. तसेच, अवघ्या दोन तासांतच अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा सभापती सीमा सावळे यांनी केली. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प ५२६२ कोटी ३० लाखांवर पोहोचला आहे.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पास त्याच दिवशी मंजुरी देत सीमा सावळे यांनी विक्रम केला. अर्थसंकल्पावरील सभा दोनदा तहकूब केली आहे. तिसरी सभा मंगळवारी होणार आहे. भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा होऊ न देता अवघ्या १० मिनिटांत अर्थसंकल्प मंजूर केला होता. ही परंपरा कायम ठेवणार, की सदस्यांना त्यावर बोलू देणार, या विषयी महापालिका वर्तुळात उत्सुकता आहे. उद्याच्या सभेत सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर निर्णय
अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली सभा दोनदा तहकूब केली होती. त्यानंतर उद्या दुपारी दोनला सभा होणार आहे. अर्थसंकल्पास मंजुरी देताना सत्ताधारी भाजपा उपसूचनांचा स्वीकार करणार किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. सत्ताधाºयांसह विरोधी पक्षातील सदस्यांनी आपापल्या भागातील विषयांच्या उपसूचना दिल्या आहेत. कामांच्या तरतुदीसाठी टोकन हेड निर्माण करावे, अशीही मागणी केली आहे. त्यामुळे उपसूचना घ्यायच्या किंवा नाहीत, यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. कोट्यवधी रुपयांच्या उपसूचना आल्या आहेत. त्यांपैकी कोणत्या स्वीकारायच्या याबाबत शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि खासदार अमर साबळे यांच्याशी चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहेत.

Web Title:  Rain falls; Discussion will be held today at the general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.