चिंचवडमध्ये पावसाचा उच्चांक! पुणे शहरातही जोरदार पाऊस
By विश्वास मोरे | Published: September 27, 2023 09:24 PM2023-09-27T21:24:42+5:302023-09-27T21:24:42+5:30
गेल्या २४ तासांमध्ये पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे....
पिंपरी : गेल्या चोवीस तासांमध्ये पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद वेधशाळेने केली आहे. २४ तासात ३१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पिंपरी -चिंचवड शहरामध्ये मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री साडेदहाला पावसाने थोडीशी उघडीप दिली. पुन्हा मध्यरात्रीनंतर पहाटे पाचपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर दहा वाजेपर्यंत पुन्हा पावसाने उघडीप दिली. सकाळी दहानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतरही सायंकाळच्या टप्प्यात अधून- मधून पाऊस पडत होता.
गेल्या २४ तासांमध्ये पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात आज नोंदवल्या गेलेल्या सर्वाधिक पावसाची ही नोंद आहे.
विभाग, पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये
१) शिवाजीनगर: ३.८ मिलिमीटर
२) पाषाण : ४.७ मिलिमीटर
३) लोहगाव :७.४ मिलिमीटर
४) चिंचवड :३१.० मिलिमीटर
५) लवळे :६.८ मिलिमीटर
६) मगरपट्टा सिटी: २.०० मिलिमीटर