पावसाची संततधार; पर्यटकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:02 AM2018-07-16T02:02:03+5:302018-07-16T02:02:05+5:30

पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे. जोरदार पावसामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांची पाणीपातळी वाढली आहेत.

Rainfall of rain; Hurricane of tourists | पावसाची संततधार; पर्यटकांचा हिरमोड

पावसाची संततधार; पर्यटकांचा हिरमोड

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे. जोरदार पावसामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांची पाणीपातळी वाढली आहेत. तसेच उद्योगनगरीच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नही सुटला आहे. लोणवळ्यात पावसाची नोंद झाली आहे, तर पवना धरण परिसरात सायंकाळी पाचपर्यंत साठ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भुशी धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पर्यटकांना पायऱ्यांवर बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.
पावसाची संततधार सुरूच आहे. सुटीचा दिवस असतानाही नागरिकांना पावसामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत पडणे अशक्य झाले होते. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. अधून मधून जोरही वाढत आहे. पाऊस सुरू असल्याने एरवी शनिवार-रविवारी गर्दी असणाºया पिंपरी कॅम्प बाजारपेठेत गर्दी नसल्याचे दिसून आले. शुकशुकाट जाणवत होता. तसेच पावसामुळे शहर परिसरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागातील लायन्स पॉइंट, कार्ला व भाजे धबधबा, लोहगड, विसापूर या ठिकाणीदेखील गर्दी केल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
>लोणावळा : लोणावळा परिसरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने डोंगरभागातून वेगाने धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून वेगाने पाणी वाहू लागल्याने पर्यटकांना धरणाच्या पायºयावर जाणे व बसणे मुश्कील झाल्याने पर्यटकांची घोर निराशा झाली. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता या ठिकाणी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवसांत सायंकाळी पाचनंतर भुशी धरणाकडे जाणारा मार्ग पर्यटकांकरिता बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने जाहीर केल्यानंतर या धरणावर वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज सकाळपासूनच धरणावर पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र, मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सांडव्यावरून वेगाने पाणी पायºयांवर येऊ लागल्याने या पायºयापर्यंत जाणे व त्यावर बसणे मुश्कील झाल्याने या ठिकाणी आलेल्या पर्यटकांची निराशा झाली.
>कोंडी
लायन्स पॉइंट परिसरात पाऊस व धुके असल्याने पर्यटकांना काहीसा थ्रिल अनुभवता आला असला, तरी लायन्स पॉइंटचे सौंदर्य व गिधाड तलावाच्या धबधब्यात भिजण्याच्या आनंदाला मुकावे लागले. वाहतूककोंडी झाली होती.
बारा दिवसांत १२४६ मिमी पाऊस
लोणावळा परिसरात १२ दिवसांत १२४६ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. लोणावळ्यात डोंगरभागातून वेगाने धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून वेगाने पाणी वाहू लागल्याने पर्यटकांना धरणाच्या पायºयावर जाणे व बसणे मुश्कील झाल्याने पर्यटकांची घोर निराशा झाली. शनिवार, रविवार, तसेच सुटीच्या दिवसांत सायंकाळी पाचनंतर भुशी धरणाकडे जाणारा मार्ग पर्यटकांकरिता बंद केला. पाणी वाढल्याने अनेक ठिकाणी धबधब्याची पाणी पातळी वाढल्याचे दिसून आले. पवना धरण परिसरात सायंकाळी पाचपर्यंत ६५ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर पवना धरण ६० टक्के भरले आहे. भराव यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने भातशेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
पावसाने सरासरी ओलांडली
पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात ४९.६ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे-नाले नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. मागील दीड आठवड्यापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने वलवण, शिरोता, पवना, आंद्रा, वाडिवळे ही मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणारी धरणे पन्नास टक्क्यांच्या पुढे गेली आहे. लोणावळा धरणातूनदेखील खोपोली वीजनिर्मिती केंद्राला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. जूनच्या संपूर्ण महिन्यात केवळ २९ इंच असलेला पाऊस पंधरा दिवसांत ८३ इंचांवर गेला आहे. गवळीवाडा नाका परिसरात चालणेदेखील मुश्किल होत आहे. हीच परिस्थिती भुशीगाव ते भुशी धरण परिसरात आहे.

Web Title: Rainfall of rain; Hurricane of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.