पिंपरी-चिंचवड ‘मसाप’च्या अध्यक्षपदी राजन लाखे

By admin | Published: March 27, 2017 03:00 AM2017-03-27T03:00:07+5:302017-03-27T03:00:07+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Rajan Lakhan was elected president of Pimpri-Chinchwad Masap | पिंपरी-चिंचवड ‘मसाप’च्या अध्यक्षपदी राजन लाखे

पिंपरी-चिंचवड ‘मसाप’च्या अध्यक्षपदी राजन लाखे

Next

पिंपरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चिंचवड येथील एका कार्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. त्यामध्ये लाखे यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदासाठी ९ सदस्य असताना १० अर्ज आले होते. त्यामुळे मतदान झाले. कार्यकारिणी - अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, कार्याध्यक्ष विनीता येनापुरे, कोषाध्यक्ष विनोद नाईक, कार्यवाह संजय जगताप, मनीषा वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर सदस्यपदी किशोर पाटील, वैभव गोडसे, मकरंद बापट, माधुरी मंगरुळकर, दीपक अमोलिक, किरण लाखे, विजय जगताप, अनंत ऊर्फ नाना दामले, दत्तू ठोकळे हे निवडून आले. विनोद कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.(प्रतिनिधी)

Web Title: Rajan Lakhan was elected president of Pimpri-Chinchwad Masap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.