रक्षाबंधन! भेटवस्तू देत घट्ट केले ‘स्नेहबंध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:32 AM2018-08-28T00:32:00+5:302018-08-28T00:32:27+5:30

भावाप्रति कृतज्ञता व्यक्त करून बहिणीने भावाला राखी बांधून औक्षण करीत गोडधोड मिठाई खाऊ घातली. भावांनी बहिणींना ओवाळणी म्हणून कुणी साडी, दागदागिने,

Rakshabandhan! Gift Gift Made Stimulated | रक्षाबंधन! भेटवस्तू देत घट्ट केले ‘स्नेहबंध’

रक्षाबंधन! भेटवस्तू देत घट्ट केले ‘स्नेहबंध’

googlenewsNext

थेरगाव : भावाप्रति कृतज्ञता व्यक्त करून बहिणीने भावाला राखी बांधून औक्षण करीत गोडधोड मिठाई खाऊ घातली. भावांनी बहिणींना ओवाळणी म्हणून कुणी साडी, दागदागिने, तर कुणी चॉकलेट देत तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. विविध भेटवस्तू देत ‘स्नेहबंध’ अधिक घट्ट केले गेले. थेरगावला घरोघरी रक्षाबंधन उत्साहात साजरे झाले.

भावाच्या हातात आकर्षक, सुंदर आणि हटके अशी राखी बांधण्यासाठी व त्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. परिसरात ठिकठिकाणी विविध भागांत राखी विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली होती. यंदा छोटा भीम, मोटू-पतलू, बालगणेश, हनुमान, डोरेमॉन, श्रीकृष्ण, मायटी राजू आदी आकारांतील सुंदर व आकर्षक राख्यांनी चिमुकल्यांना भुरळ पाडली होती. बाजारात रुपयापासून ते हजार रुपयांपर्यंतच्या विविध आकारांतील आणि विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध होत्या. याशिवाय सराफ व्यावसायिकांनीही या रक्षाबंधनाच्या सोहळ्यासाठी सोन्या-चांदीच्या राख्या उपलब्ध करून दिल्या होत्या. नोकरी आणि व्यवसायानिमित्त परगावी असलेल्या आणि सासरहून माहेरी जाता येत नसल्याने गावाकडे असलेल्या आपल्या भावाला राखी पौर्णिमेच्या अगोदर राखी मिळावी यासाठी राख्यांची खरेदी करून त्या पोस्ट आणि कुरिअर कंपनीच्या सेवेचा आधार घेऊन आपल्या भावापर्यंत पोचविल्या गेल्या होत्या.

खडकीत अपंग जवानांना राख्या
खडकी : देशाच्या रक्षणार्थ लढताना अपंगत्व आलेल्या जवानांना खडकीत राख्या बांधण्यात आल्या. शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे आयोजन करण्यात आले होते. खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना महिला आघाडी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड विभाग संघटिका दीपाली बिवाल, सीमा वरखडे, करुणा घाडगे, नूतन जाधव, सायली पवार, सुनयना कोरे, नंदिनी मुलतानी, अंजु सिंह, सनी कोरे, हिमानी बिवाल, रुतिका मुलतानी आदी उपस्थित होते.

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना राखी
मोशी : निघोजे येथील महिला लोकप्रतिनिधींनी चाकण एमआयडीसीतील अग्निशामक दलाच्या अधिकाºयांना राख्या बांधल्या. चाकण एमआयडीसी अग्निशामक अधिकारी, कर्मचारी आपत्तीकाळात देवदूताप्रमाणे मदतीला येतात. नागरिकांचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांना राखी बांधून सण साजरा केल्याचे शीला शिंदे यांनी सांगितले. या वेळी त्यांच्याबरोबर निघोजे गावच्या माजी सरपंच कांचन शिंदे, माजी सरपंच सुनीता येळवंडे, कोमल येळवंडे, किसनाबाई जामदार,सईद्राबाई येळवंडे यांनी जवानांना राख्या बांधल्या.

जवानांना राख्या
चाकण : येथील नवोन्मेष प्राथमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. विद्यार्थ्यांनी जवानांना राखी बांधून त्यांच्याशी हितगुज केले. जवानांनी लढाईदरम्यान आलेले अनुभव विद्यार्थ्यांना कथन केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना बिरदवडे, शिक्षक अर्चना पिंगळे, सोनाली उमवने, नम्रता गोतारणे, रुक्मिणी शेवकरी, किरण कारोटे उपस्थित होते. जवानांप्रती प्रत्येक भारतीयाने आदर बाळगला पाहिजे.

वाहतूक नियमन
पिंपरी : रक्षाबंधनाच्या दिवशी भर दुपारी भोसरी परिसरात पुणे-नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या वेळी आमदार महेश लांडगे यांनी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियमन केले. भोसरी परिसरात रविवारी दुपारी पुणे-नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. अनेक नागरिक आणि वाहने या कोंडीत अडकले होते. या वेळी बहिणींना आपल्या भावाला वेळेवर राखी बांधता यावी यासाठीफाउंडेशनचे कार्यकर्ते वाहतूक नियमन करीत होते.

Web Title: Rakshabandhan! Gift Gift Made Stimulated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.