माऊलींचेही रक्षाबंधन, ज्ञानदेवांना मुक्ताईची राखी अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:12 AM2018-08-27T01:12:26+5:302018-08-27T01:12:50+5:30
येथील श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधनदिनी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्यावतीने अध्यक्ष रवींद्र पाटील
आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधनदिनी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्यावतीने अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पाठविलेली राखी श्रींच्या समाधीला स्पर्श करीत अर्पण करण्यात आली. मंदिरात श्रींना राखी अर्पण करण्यासह दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी रक्षाबंधनदिनी मुक्ताईची श्रींसाठीची राखी हभप गजाननमहाराज लाहूडकर यांच्या हस्ते स्वीकारली. रक्षाबंधनदिनाची येथील परंपरा श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्यावतीने अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी श्रींना राखी पाठवित कायम ठेवली. यावेळी आळंदी देवस्थानच्यावतीने व्यवस्थापक माऊली वीर यांनी श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचा सन्मान गजाननमहाराज लाहूडकर यांचा श्रीफळ प्रसाद भेट देऊन करण्यात आला. आळंदीतील माऊली मंदिरासह परिसरातील घराघरांमध्ये रक्षाबंधनदिनी उत्साहात रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले.