पंतप्रधान आवास योजनेतील मागण्यांसाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:33 AM2017-08-05T03:33:02+5:302017-08-05T03:33:02+5:30
येथील नगर परिषद हद्दीत राबविण्यात येणाºया पंतप्रधान आवास योजनेतील प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेते किशोर भेगडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
तळेगाव दाभाडे : येथील नगर परिषद हद्दीत राबविण्यात येणाºया पंतप्रधान आवास योजनेतील प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेते किशोर भेगडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
सकाळी साडेअकराच्या सुमारास मारुती मंदिर चौकापासून नगर परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात समितीच्या नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, विशाल दाभाडे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. शहर अभियंता अनिल अनगळ यांनी निवेदन स्वीकारले.
किशोर भेगडे म्हणाले, झोपडपट्टी धारक व गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. स्थानिक लाभार्थींना विश्वासात घ्यावे. योजना राबविताना पारदर्शकता हवी.
योजनेविषयी जनजागृती झाली पाहिजे. खरे लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
नगर परिषद हद्दीतील नीलकंठनगर, संभाजीनगर, सर्व्हे नंबर ६५२३, सिद्धार्थनगर आदी भागांतील झोपडपट्टीधारक, बेघर नागरिक आदींना पंतप्रधान आवास योजनेतून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रास्ताविक अरुण माने यांनी केले. आभार संतोष भेगडे यांनी मानले.