मावळातील धरणांची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:07 AM2018-05-15T02:07:19+5:302018-05-15T02:07:19+5:30

Ram Bharoschel protects the Maval dams | मावळातील धरणांची सुरक्षा रामभरोसे

मावळातील धरणांची सुरक्षा रामभरोसे

Next

पवनानगर : मावळात पवना, वडिवळे, आंद्रा, भुशी, वलवण या धरणांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहणीत दिसून आले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने धरणपरिसर दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.
पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हे तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असून धरण परिसरात राज्य व परराज्यातून अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. परंतु, याठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची यंत्रणा नसल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे पवना धरणाचे अधिकारी व कर्मचारी काणाडोळा करताना दिसत आहेत. तर गेल्या काही दिवसांपूर्वी धरणाच्या पवना विद्युत वीज केंद्रात एका व्यक्तीने पाणी सोडण्याच्या गेटचे बटन दाबल्याने गेट खाली पडले.
धरण क्षेत्रात परिसरातील अनेक तरुण वर्ग सायंकाळच्या वेळी मद्यपान करण्यासाठी धरणाच्या कडेला व धरणाच्या दरवाजाजवळच बसले असतात. तर काही जण पवनानगर येथील विश्रामगृहाच्या कट्यावर बसून मद्यपान करत असतात. धरणाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्याठिकाणी मद्यपान करून काचा फोडणे त्यामुळे परिसरातील शेतकºयांना शेतावर जाताना मोठी दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ आजही अशा घटना घडत आहेत. पवना वीज केंद्राच्या गेटवर सुरक्षारक्षक नसल्याने स्थानिक लोक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर सायंकाळीच्या वेळी आतमध्ये प्रवेश करून मद्यपान करताना दिसतात. वीज केंद्राच्या आत जाण्यासाठी हे मुख्य गेट आहे तरी त्या ठिकाणी कोणताही सुरक्षारक्षक नसतो. धरण परिसरात पाणी सोडण्याच्या दरवाजाजवळ मोठ्या प्रमाणावर गवताचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे. धरण परिसरात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण अशा मोठमोठ्या शहरांतील बिल्डर, राजकीय नेते, अभिनेते, अशा उद्योजकांचे बंगले व फार्म हाऊस असून, या ठिकाणी दर शनिवारी व रविवारी बेकायदारीत्या पार्टीचे नियोजन केले जाते. काही वर्षांपूर्वी याच भागात मोठी रेव्ह पार्टी करताना काही लोकांना पकडले होते. तर अशा प्रकारांना जबाबदार कोण, असा स्थानिक पातळीवर संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
धरणाच्या अनेक वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा भिंत नाही. धरणातील बेकायदा पाणीउपसा होत आहे, तरीदेखील अधिकारी गप्प का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असल्याचे दिसून येत आहे.
पवना धरण परिसराच्या सुरक्षेसाठी आम्ही जागोजागी सुरक्षिततेचे फलक लावले आहे. धरणाच्या दरवाजाजवळ दोन बंदूकधारी कर्मचारी नेमण्यासाठी नियोजन केले आहे. पवना धरण परिसरात बोट सुरू असलेल्या सर्व परवानाधारक बोटधारकांना परवाना देताना नियम व अटी घालून दिल्या आहेत.
- मनोहर खाडे, शाखा अभियंता, पवना धरण

Web Title: Ram Bharoschel protects the Maval dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.