अनधिकृत बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 08:40 PM2019-06-15T20:40:26+5:302019-06-15T20:41:12+5:30
अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत ती तक्रार मागे घेण्यासाठी महिलेने पाच ते दहा लाखांची खंडणी मागितली. महिलेचे पैसे देऊन विषय संपवून टाक नाही, तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी एकाने दिली. पिंपरी पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत ती तक्रार मागे घेण्यासाठी महिलेने पाच ते दहा लाखांची खंडणी मागितली. महिलेचे पैसे देऊन विषय संपवून टाक नाही, तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी एकाने दिली. पिंपरी पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश सुरेश सचदेव (वय ३५, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. संगीता शहा या महिलेसह एका ३२ वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तिच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी संगीता शहा हिने गिरीश सचदेव यांना फोन केला. तुमच्या अनधिकृत बांधकामाबाबत मी महापालिकेत तक्रार दिली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी पाच ते दहा लाख रुपये दे. तरच मी तक्रार मागे घेईन, अशी धमकी फोनवरून आरोपी शहा हिने सचदेव यांना दिली. एक अनोळखी व्यक्ती आठवड्यापूर्वी फिर्यादी सचदेव यांच्या पिंपरीतील दुकानात आला. ‘तू संगीता शहा यांचे पैसे देऊन विषय संपवून टाक. नाही तर तुझे काही खरे नाही’, अशी धमकी फिर्यादी सचदेव यांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.