जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 19:51 IST2020-02-28T19:47:19+5:302020-02-28T19:51:38+5:30
जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पिंपरी : पालक घरी नसताना जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाकड परिसरात २०१९ च्या दसरा सणाच्या दिवसापासून १५ फेब्रुवारी २०२० या दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ३८ वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल वाघमारे (वय २७, रा. थेरगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे पालक घरात नसल्याचा आरोपीने गैरफायदा घेतला. आरोपी जबरदस्तीने घरात घुसला. मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केला. मम्मी पप्पा घरी नाहीत, तुम्ही बाहेर जा, असे १४ वर्षीय पीडित मुलीने विनवणी केल्यानंतरही आरोपीने अत्याचार केला. हा प्रकार २०१९ च्या दसरा सणादिवशीपासून १५ फेब्रुवारी २०२० या दरम्यान वारंवार घडला आहे. याबाबत घरी सांगितल्यास तुझ्यासह, तुझी आई, वडील व भावाला जीवे मारणार, अशी धमकी देखील आरोपीने दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.