Pune Crime | लग्नाच्या आमिषातून रावेतमध्ये महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:27 IST2022-04-06T18:25:20+5:302022-04-06T18:27:26+5:30
१६ नोव्हेंबर २०२१ ते २१ मार्च २०२२ या कालावधीत ही घटना...

Pune Crime | लग्नाच्या आमिषातून रावेतमध्ये महिलेवर बलात्कार
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार प्रकरणी तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रावेत व वाकड येथे १६ नोव्हेंबर २०२१ ते २१ मार्च २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. ५) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गौरव बाजीराव गायकवाड (वय ३०, रा. रावेत) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. तसेच फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.