लग्नाच्या आमिषाने तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध; गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गोळ्या खायला लावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 18:51 IST2022-04-14T18:51:37+5:302022-04-14T18:51:46+5:30
तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वेळोवेळी शारीरिक संबध ठेवले

लग्नाच्या आमिषाने तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध; गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गोळ्या खायला लावल्या
पिंपरी : तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वेळोवेळी शारीरिक संबध ठेवले. त्यातून गरोदर राहिल्याने गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खायला लावून तिचा तीन वेळा गर्भपात केला. वाकड येथे १५ जानेवारी ते १३ एप्रिल २०२२ या कालावधीत वाकड येथे हा प्रकार घडला. आकाश बुचडे (वय २६, रा. मारुंजी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीसोबत ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्न करण्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी आपण एकत्र राहू, असे सांगून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार वारंवार घडला. त्यातून पिडीत तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली. तरुणाने तिला तीन वेळा बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खायला लावून तिचा गर्भपात केला.