लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; थेरगावच्या तरुणावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 03:14 PM2021-04-13T15:14:19+5:302021-04-13T15:14:38+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले.
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर महिलेने लग्नाची विचारणा केली असता शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. याप्रकरणी तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १२) फिर्याद दिली आहे. श्रीसैल शिवा कांबळे (वर २३, रा. पडवळ नगर, थेरगाव), असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांनी लग्न करण्याबाबत विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. ऑगस्ट २०१८ ते १३ मार्च २०२१ दरम्यान थेरगाव, वाकड, पिंपळे सौदागर, रावेत येथे वेळोवेळी हा प्रकार घडला.
दरम्यान, पीडित महिलेने याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हा गुन्हा वाकड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.