लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार; भोसरीत तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:00 PM2021-07-16T20:00:56+5:302021-07-16T20:01:32+5:30

लग्नास नकार दिल्याने तरुणीने विषारी औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

Rape on youth girl by pretext of marriage; Crime filed against youth in Bhosari | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार; भोसरीत तरुणावर गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार; भोसरीत तरुणावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : प्रेमसंबंध निर्माण करून, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर एका तरुणाने वारंवार तिच्या मर्जीविरोधात जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार दिला. यामुळे तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणाने त्या दोघांमधील फोटो, मेसेज, रेकॉर्डिंग डिलीट केले. तरुणीने लिहिलेली डायरी लपवली. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
अविनाश अनंत भांगे (वय २७, रा. नखातेवस्ती, काळेवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार जून २०१९ ते १३ जुलै २०२१ या कालावधीत मळवली स्टेशन लोणावळा येथे एका लॉजवर, पीडित तरुणीच्या घरी आणि हिंजवडी येथील एका लॉजिंगवर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीला शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली. एवढे करून त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.

यामुळे तरुणीने विषारी औषध प्राशन केले. ती हॉस्पिटलमध्ये असताना अविनाश याने तिने लिहून ठेवलेली डायरी, मोबाईलमधील सर्व फोटो, मेसेज, रेकॉर्डिंग डिलीट केले. अजित अनंत भांगे या व्यक्तीच्या फोनवरून पीडित तरुणीला फोन करून त्यातील अविनाशला मेसेज का केलेस. तू त्याचे दोन वर्षे आयुष्य बरबाद केले आहे. तू त्याच्याशी लग्न करून त्याला बरबाद करणार आहेस का, असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Rape on youth girl by pretext of marriage; Crime filed against youth in Bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.