पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच सापडला अलबिनो जातीचा दुर्मिळ साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:14 PM2018-08-10T18:14:35+5:302018-08-10T18:15:43+5:30

साधारण एक फूट लांबीचा असणारा गोल्डन कलर चा हा विरुळा साप बिनविषारी असला तरी चिडका स्वरूपाचा असतो.

A rare snake of Albino name found in Pune district | पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच सापडला अलबिनो जातीचा दुर्मिळ साप

पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच सापडला अलबिनो जातीचा दुर्मिळ साप

googlenewsNext

भोसरी : भोसरी येथील एका घरात अलबिनो नावाचा दुर्मिळ असा साप सापडला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा साप पहिल्यांदाच सापडला असल्याची माहिती सर्पमित्र अमर गोडांबे यांनी दिली.शुक्रवारी (दि. १० ऑगस्ट ) दुपारी धावडे आळी येथील सुखदेव धावडे मार्ग येथील अमर धावडे यांच्या घरात हा साप आढळून आला होता. यावेळी सर्पमित्र गोडांबे यांनी हा साप पकडला. हा अतिशय जातीचा दुर्मिळ साप असल्याचे त्यांनी सांगितले. साधारण एक फूट लांबीचा असणारा गोल्डन कलर चा हा विरुळा साप बिनविषारी असला तरी चिडका स्वरूपाचा असतो .त्यांनी त्याला सुरक्षित स्थळी जंगलात सोडून देऊन या सापाला जीवदान दिले आहे.  

Web Title: A rare snake of Albino name found in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.