‘ढोल बाजे रे’तर्फे रास दांडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2016 01:19 AM2016-10-11T01:19:40+5:302016-10-11T01:19:40+5:30
निगडी-प्राधिकरणातील तरुणांसाठी ‘ढोल बाजे रे’ नवरात्रोत्सव समितीच्या वतीने रास दांडियाचे आयोजन करण्यात आले. गेल्या आठ वर्षांपासून महापौर
पिंपरी : निगडी-प्राधिकरणातील तरुणांसाठी ‘ढोल बाजे रे’ नवरात्रोत्सव समितीच्या वतीने रास दांडियाचे आयोजन करण्यात आले.
गेल्या आठ वर्षांपासून महापौर निवासासाठी नियोजित असलेल्या भूखंडावर हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीतील शेवटच्या सहा दिवसांकरिता यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येते. शहरातील श्वेता ग्रुप, संस्कृती क्रिएशन अशा विविध रासगपबाचे ग्रुप या उत्सवात सहभाग घेऊन अनेक पारितोषिकांची लयलूट करतात. दर वर्षी आनंदी व उत्साही वातावरणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचे आयोजन ‘ढोल बाजे रे’ मंडळाचे संस्थापक रामकुमार शर्मा, सचिन नावंदर आणि अफरोज सय्यद यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)