रावेत बंधाऱ्याची ५१० एमएलडी पाणी साठवणूकक्षमता वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:47 AM2018-12-28T01:47:51+5:302018-12-28T01:48:37+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाºया रावेत बंधाºयाची उंची वाढविण्यासाठी पवना नदीपात्राचे ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण केले.
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाºया रावेत बंधाºयाची उंची वाढविण्यासाठी पवना नदीपात्राचे ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात नदीपात्रात दोन ठिकाणी मोठ्या उंचीचे खडक आढळले असून, अर्ध्या मीटरने बंधाºयाची उंची वाढविल्यास २५० एमएलडी; तर एक मीटर उंची वाढविल्यास पाणी साठवण क्षमतेमध्ये ५१० एमएलडीची वाढ होणार आहे. यासाठी लवकरच पाहणी दौरा केला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. पवना नदीवरील रावेत येथील बंधाºयातून पाणी उचलले जाते. पन्नास वर्षांहून
अधिक काळ या बंधाºयास झाले आहेत. शहराची लोकसंख्या
वाढली आहे. तसेच, बंधाºयाची साठवण क्षमता कमी झाली आहे. सद्य:स्थितीत रावेत बंधाºयातून महापालिका ४८० एमएलडी, एमआयडीसी १२० एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ३० एमएलडी जलउपसा करते. हा बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित आहे. देखभाल-दुरुस्ती पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येते.
असे झाले सर्वेक्षण
हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्य:स्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपशाच्या अनुषंगाने कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. त्यानंतर महापालिकेने ड्रोनद्वारे आठ किलोमीटर सर्वेक्षण केले. जॅकवेलपासून अनुक्रमे चार व २६ मीटर अंतरावर दोन ठिकाणी मोठ्या उंचीचे खडक आढळले आहेत.
पूरनियंत्रण रेषेपेक्षा बॅकवॉटरची उंची कमी
या सर्वेक्षणात अर्धा व एक मीटर उंची
वाढविल्यास रावेत बंधाºयापासून आठ किलोमीटरपर्यंत पाण्याची उंची किती असू शकेल, याची मोजणी केली. त्यामध्ये पूरनियंत्रण रेषेचादेखील अभ्यास केला. त्यानुसार पूर नियंत्रणरेषेनुसार ५६५ डॅम टॉप उंची असणार आहे, तर एक मीटरने बंधाºयाची उंची वाढविल्यास पाण्याची पातळी ५६२.७ एवढी उंची असणार आहे. याशिवाय सध्या पवना बंधाºयाची लांबी २०० मीटर असून, उंची वाढविल्यास या बंधाºयाची लांबी ३० मीटरने वाढणार आहे.
अर्धा मीटर उंची वाढविणार
बंधाºयाची उंची वाढविण्याचे दोन प्रस्ताव विचाराधीन आहेत. अर्धा मीटरने बंधाºयाची उंची वाढविल्यास बंधाºयाची पाणी साठवणक्षमता अडीचशे एमएलडीने वाढणार आहे. तर एक मीटरने उंची वाढविल्यास दुपटीने म्हणजेच पाचशे एमएलडी पाणी साठवणूकक्षमता वाढणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाला सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत बंधाºयाची संयुक्त पाहणी केली जाणार आहे.