Bhosari Vidhan Sabha: रवी लांडगेंची माघार; 'मविआ' ची डोकेदुखी संपली, भोसरीत दुरंगी सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:57 PM2024-11-05T16:57:27+5:302024-11-05T16:58:23+5:30
महायुतीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मागील दोन निवडणुकांत बाजी मारली असून, यंदा त्यांना हॅट्रिकची संधी
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात एकूण ११ उमेदवार असले तरी महायुतीतील भाजपचे महेश लांडगे व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यातच दुरंगी सामना रंगणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भोसरीतून उद्धवसेनेचे रवी लांडगे यांनी माघार घेतल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र सोमवारी (दि. ४) अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले. उद्धवसेनेचे रवी लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणे यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे तिरंगी लढत होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, उद्धवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याने सोमवारी बंडखोर रवी लांडगे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भोसरीतील चित्र स्पष्ट झाले असून, महायुती आणि महाविकास आघाडीत दुरंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मागील दोन निवडणुकांत बाजी मारली असून, यंदा ते हॅट्रिक करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अजित गव्हाणे यांना मैदानात उतरवले आहे.
एकूण अर्ज - २४
बाद अर्ज - ६
वैध अर्ज - १८
माघार घेतलेले उमेदवार- ७
रिंगणात असलेले उमेदवार - ११
प्रमुख लढत
महेश लांडगे (भाजप)
अजित गव्हाणे (राष्ट्रवादी शरद पवार)
रिंगणातील इतर उमेदवार
बलराज कटके (बहुजन समाज पार्टी), अमजद महेबूब खान (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत), जावेद शहा (स्वराज्य शक्ती सेना), अरुण पवार (अपक्ष), खुदबुद्दीन होबळे (अपक्ष), गोविंद चुनचुने (अपक्ष), हरीश डोळस (अपक्ष), रफीक कुरेशी (अपक्ष), शलाका कोंडावार (अपक्ष)
यांनी घेतले अर्ज मागे
परमेश्वर बुर्ले (राष्ट्रीय समाज पक्ष), रामा ठोके (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), सूरज गायकवाड (अपक्ष), दत्तात्रय जगताप (अपक्ष), सुभाष वाघमारे (अपक्ष), रवी लांडगे (अपक्ष), संतोष लांडगे (अपक्ष)
एकूण मतदारांची संख्या
पुरुष - ३,२४,६९९
महिला - २,७६,०५२
इतर - ९७
एकूण - ६,००,८४८