महापालिकेच्या तिजोरीत ‘रेरा’ने भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:04 AM2018-02-24T02:04:02+5:302018-02-24T02:04:02+5:30
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत मोठ्या प्रमाणांवर बांधकाम व्यवसाय वाढत असून,
पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत मोठ्या प्रमाणांवर बांधकाम व्यवसाय वाढत असून, शहराचे रूपडे पालटले आहे. नागरीकरण झपाट्याने वाढत आहे़ रहिवासीकरणाबरोबरच कमर्शियल कॉम्प्लेक्स, एॅम्युझमेंट पार्क, नामांकित हॉटेल्सची वाढ होत आहे. बांधकाम परवानातून मिळणाºया उत्पन्नातही भर पडली आहे. तीनशे चाळीस कोटींचे उद्दिष्ट एक महिना अगोदरच पूर्ण केले आहे. त्यात सुमारे साठ कोटींची भर पडणार आहे. रेरामुळे उत्पन्न वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १ हजार ७०० हून अधिक बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यातून बांधकाम परवाना विभागाला ३९९ कोटींचा महसूल मिळाला आहे. राज्य सरकारने रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अॅक्ट) हा नवीन कायदा १ मेपासून लागू केल्याने बांधकाम व्यावसायिकांनी अधिकाधिक महसूल महापालिका तिजोरीत भरला आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने समाविष्ठ गावांतील विकासाला प्राधान्य दिले आहे. महापौर नितीन काळजे यांनी समाविष्ठ गावांतील आरक्षणांचा विकास करण्यास प्राधान्य दिले आणि सुमारे चारशे पंचवीस कोटींचा निधी वापरला गेला आहे. चºहोली, मोशी, दिघी, किवळे, ताथवडे परिसरातील आरक्षणे विकसित केली जात आहेत.
अवैध बांधकामांविरुद्धच्या कारवाईमुळे रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करणाºयांची संख्या वाढली. गतवर्षी बांधकाम परवानगी घेतलेल्यांची संख्या १५२३ होती. ती या वर्षी १ हजार ७०० हून अधिक झाली आहे. निवासी बांधकामांच्या तुलनेत व्यावसायिक बांधकामांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. बांधकाम परवाना विभागाला ३७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २१ फे ब्रुवारीपर्यंत ३९९ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. शहरात बांधकामांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराच्या विकासात वाढ होत असल्याचे हे निदर्शक आहे. यंदाच्या उत्पन्न वाढीसाठी रेराचा फायदा झाला. रेरामुळे बांधकाम व्यावसायिकांनी रीतसर बांधकाम परवानग्या घेण्यावर भर दिला. मार्चअखेरपर्यंत उत्पन्नात भरीव वाढ होईल. - राजन पाटील, सहशहर अभियंता
पुणे-मुंबईकरांचा वाढला ओढा
औद्योगिकनगरी म्हणून शहराची ओळख जाऊन आता आयटी सिटी अशी होणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसराला लागून असणाºया हिंजवडी, तळवडे, तळेगाव, पुणे शहरातील कॉल सेंटर तसेच इतर क्षेत्रांतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकºयांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात येणाºयांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. जागेच्या उपलब्धतेमुळे बड्या उद्योगांनी पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरात उद्योगधंदे उभारले आहेत. हिंजवडी सारख्या भागात आयटी पार्क विकसित झाले असले तरीही मूलभूत सुविधांमुळे या उद्योगांमध्ये स्थिर स्थावर झालेल्यांकडून पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास पसंती दिली जात आहे.