हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन तरुणींचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:29 IST2025-01-24T18:27:46+5:302025-01-24T18:29:53+5:30
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या दोघी तरुणी जागीच ठार झाल्या.

हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन तरुणींचा जागीच मृत्यू
हिंजवडी : हिंजवडी - माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (दि. २४) दुपारी पावणे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. रेडिमीक्सने भरलेला डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार दोन तरुणी जागीच ठार झाल्या. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती अशी की, या तरुणी दुचाकीने (MH/12 XL 5744) चालल्या होत्या त्याच वेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणी त्याखाली चिरडल्या गेल्या.
हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन तरुणींचा जागीच मृत्यू pic.twitter.com/OCGEBeQz9a
— Lokmat (@lokmat) January 24, 2025
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या दोघी तरुणी जागीच ठार झाल्या.घटनास्थळी हिंजवडी पोलीस पोहोचले असून क्रेनच्या सहाय्याने डंपर उचलून तरुणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृत्युमुखी पडलेल्या तरुणींची ओळख अद्याप पटली नसून दोन्ही तरुणी आयटी क्षेत्रातील अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.