दहा हजारांचा दंड वसूल
By admin | Published: July 30, 2016 04:56 AM2016-07-30T04:56:55+5:302016-07-30T04:56:55+5:30
तळवडे गावठाण परिसरातील कारखान्यांमध्ये डासोत्पत्ती स्थानके आढळून आले. ज्या ठिकाणी ही स्थानके आढळून आली त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
पिंपरी : तळवडे गावठाण परिसरातील कारखान्यांमध्ये डासोत्पत्ती स्थानके आढळून आले. ज्या ठिकाणी ही स्थानके आढळून आली त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत दहा हजारांचा दंड जमा झाला.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक एकमधील तळवडे गावठाण, रुपीनगर या परिसरात आरोग्य विभागामार्फत डेंगी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. घरोघरी तसेच खासगी व्यवसाय करणाऱ्या संस्था, कारखाना, टायरची दुकाने, भंगार व्यावसायिक यांची तपासणी करण्यात आली. यासह नागरिकांच्या घरांमध्ये पाण्याच्या टाकी, बॅरल, टायर, छतावरील टाकाऊ वस्तू यांचीही तपासणी करण्यात आली. डासोत्पत्ती स्थानके आढळून आलेल्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. यातून दहा हजारांचा दंड जमा झाला.
ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, सहायक आरोग्याधिकारी डी. जे. शिर्के, मुख्य आरोग्य निरीक्षक एस. एस. कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक एस. ए. माने यांनी केली. (प्रतिनिधी)