पिंपळे सौदागरला रेड डॉट मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:21 AM2018-10-04T01:21:57+5:302018-10-04T01:22:19+5:30

उपक्रम : स्वच्छता राखून कचरा वर्गीकरणाचे आवाहन

Red dot campaign in Pimpale Saudagar | पिंपळे सौदागरला रेड डॉट मोहीम

पिंपळे सौदागरला रेड डॉट मोहीम

Next

रहाटणी : नाना काटे सोशल फाउंडेशन व रोझ लँड रेसिडेन्सीतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त रेड डॉट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रेड डॉट मोहीम राबवणे म्हणजे स्वच्छता राखून कचऱ्याचे वर्गीकरण करणे. मळलेल्या सॅनेटरी नॅपकिन आणि डायपर, स्वयंपाक घरातील कचऱ्यातत मिसळण्यापासून प्रतिबंध करतील. वापरल्या जाणाऱ्या सॅनेटरी नॅपकिन विघटन करण्यासाठी ५०० ते ६०० वर्षे लागतात.

वापरलेला डायपर त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. डायपर आणि सॅनेटरी नॅपकिनचे उत्पादन टाकाऊ पदार्थांचे पाकीट प्रदान करणे आणि कचरा व्यवस्थापन नियम २०१६ प्रमाणे स्वच्छता विषयक टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अशा कचºयापासून कम्पोस्ट खत निर्मिती करता
येईल. स्वच्छताविषयी काम करणाºया कामगारांना रेड डॉट मोहिमेमुळे कचरा वर्गीकरण करण्यास मदत होईल. यामुळे बºयाच गरीब महिलांना कचºयाच्या कामासाठी अनावश्यक संक्रमण आणि आरोग्य समस्या टाळता येतील. स्वच्छेतेचा कचरा मोजण्यास मदत आणि चांगले प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी डेटा विश्लेषण करता येईल.

रेड डॉट या मोहिमेमध्ये रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. रहाटणी, पिंपळे सौदागर परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या भागातील नगरसेविका शीतल नाना काटे यांनी केले.

Web Title: Red dot campaign in Pimpale Saudagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.