‘आरपीआय’मध्ये निलंबनावरून कलगीतुरा

By admin | Published: February 11, 2017 02:25 AM2017-02-11T02:25:19+5:302017-02-11T02:25:19+5:30

आरपीआयचे (आठवले गट) जे उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यावर आरपीआयच्या नेत्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे

Regarding suspended suspension in RPI | ‘आरपीआय’मध्ये निलंबनावरून कलगीतुरा

‘आरपीआय’मध्ये निलंबनावरून कलगीतुरा

Next

पिंपरी : आरपीआयचे (आठवले गट) जे उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यावर आरपीआयच्या नेत्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे, असे आरपीआयच्या शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
या निवेदनानंतर निलंबनाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. आरपीआयच्या प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे अधिकार शहरातील नेत्यांना कोणी दिले, असा मुद्दा भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या आरपीआयचे पदाधिकारी असलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. आरपीआय आणि भाजपाची युती जागावाटपावरून फिसकटली. उमेदवारीअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीयादी जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे घोळ झाला. काहींच्या अर्जाला भाजपाचा ए बी फॉर्म जोडला गेला. परंतु हा मुद्दा आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादंग निर्माण करण्यास कळीचा
मुद्दा बनला आहे. भाजपाच्या
चिन्हावर जे निवडणूक लढणार
आहेत. त्यांनी पक्षांच्या नेत्यांचा
फोटो वापरू नये, अशी
तंबी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Regarding suspended suspension in RPI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.