क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना

By admin | Published: April 13, 2017 03:52 AM2017-04-13T03:52:30+5:302017-04-13T03:52:30+5:30

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार महापालिका निवडणुकीत प्रभागांची फेररचना केली आहे. आता प्रशासकीय कामकाजासाठी सहा क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना

Regional Offices Reconstruction | क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना

क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना

Next

पिंपरी : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार महापालिका निवडणुकीत प्रभागांची फेररचना केली आहे. आता प्रशासकीय कामकाजासाठी सहा क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना केली आहे. अ आणि क क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्येकी सहा प्रभागांचे कामकाज, तर ब, ड, ई आणि फ या चार क्षेत्रीय कार्यालयांतून प्रत्येकी पाच प्रभागांचे कामकाज चालणार आहे.
महापालिका प्रशासकीय कामकाजासाठी १९९७ मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती केली होती. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती केली. या सहा प्रभागांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्याचा ठराव २०१२ मध्ये सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून महापालिका मुख्यालय आणि सहा क्षेत्रीय कार्यालयांतून प्रशासनाचा गाडा चालविला जातो.
फेब्रुवारी २०१७ मध्ये चार सदस्यीय पद्धतीने महापालिका निवडणूक झाली. १७ लाख २७ हजार लोकसंख्या विचारात घेऊन ३२ प्रभागांची रचना करण्यात आली. ही प्रभागरचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मोठे बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, तसेच नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना केली आहे. महापालिकेचे सध्याचे कार्यक्षेत्र
१८१ चौरस किलोमीटर आहे. भौगोलिक सलगता पाहून ही फेररचना करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. त्यावर सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे.(प्रतिनिधी)

क्षेत्रीय कार्यालयप्रभाग क्रमांक
अ क्षेत्रीय कार्यालय, भेळ चौक, प्राधिकरण १०, १३, १४, १५, १६, १७
ब क्षेत्रीय कार्यालय, लिंक रोड, चिंचवडगाव १८, १९ , २१, २२, २७
क क्षेत्रीय कार्यालय, नेहरुनगर, पिंपरी८,२०,२९, ३०, ३१, ३२
ड क्षेत्रीय कार्यालय, औंध - रावेत रस्ता, रहाटणी २३, २४, २५, २६, २८
ई क्षेत्रीय कार्यालय, पांजरपोळ, भोसरी ३, ४ , ५, ६, ७
फ क्षेत्रीय कार्यालय, प्राधिकरण इमारत, निगडी१, २, ९, ११, १२

Web Title: Regional Offices Reconstruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.