महावितरणच्या सहायक अभियंत्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:53 PM2019-12-11T15:53:53+5:302019-12-11T15:58:26+5:30

महिलेच्या दुकानामध्ये येऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून केला विनयभंग

Registered a crime of molestation against conduct Assistant Engineer of electricity board | महावितरणच्या सहायक अभियंत्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

महावितरणच्या सहायक अभियंत्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देचिखलीतील जाधववाडी येथे नोव्हेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान वेळोवेळी घडला हा प्रकार याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : कामाच्या निमित्ताने फोनव्दारे महिलेने महावितरणच्या सहायक अभियंत्याशी संपर्क केला. त्यानंतर अभियंत्याने फोनव्दारे, व्हॉटसअपव्दारे ओळख वाढवून, मेसेज पाठवून महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेच्या दुकानामध्ये येऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. चिखलीतील जाधववाडी येथे नोव्हेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान वेळोवेळी हा प्रकार घडला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत वरुडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी वरूडे महावितरण कंपनीच्या चिखली येथील कार्यालयात सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दी महिलेचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे.
फियार्दी महिलेने कामानिमित्त आरोपी वरुडे यांना फोन केला . त्यानंतर आरोपीने फोनव्दारे, व्हॉटसअपव्दारे ओळख वाढवून मेसेज पाठविले. तसेच महिलेच्या दुकानासमोरील रस्त्याने जात-येत असताना दुकानाकडे पाहून पाठलाग केला. त्यानंतर फिर्यादी महिला त्यांच्या दुकानात असताना दुपारी आरोपी तेथे गेला. त्यानंतर गप्पा करताना मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
 

Web Title: Registered a crime of molestation against conduct Assistant Engineer of electricity board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.