बारावी पेपर तपासणीवर नियामकांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:10 AM2018-02-22T03:10:22+5:302018-02-22T03:10:24+5:30
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मागण्या मान्य करूनही त्याबाबच्या अंमलबजावणीसाठी आदेश न काढल्याच्या निषेधार्थ संघटनेकडून बारावीच्या पेपर
पुणे : राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मागण्या मान्य करूनही त्याबाबच्या अंमलबजावणीसाठी आदेश न काढल्याच्या निषेधार्थ संघटनेकडून बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभुमीवर बुधवारी पुण्यात झालेल्या बारावी इंग्रजी विषय पेपर तपासणीबाबतच्या बैठकीमध्ये मुख्य नियामकांनी बैठकीमध्ये सहभागी न होता बहिष्कार टाकला.
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्यावतीने त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. यापार्श्वभुमीवर त्यांनी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षक मान्यतेसाठी एप्रिल २०१७ मध्ये कॅम्प घेऊनही अद्याप मान्यता न झाल्याने शिक्षक विनावेतन राबत आहेत. राज्यात २८ हजारांपेक्षा जास्त शिक्षक शासकीय वेतनापासून वंचित
आहेत. अर्धवेळ शिक्षकांचे वेतन अखंडितपणे मिळत नाही, त्यांना पेन्शन व इतर लाभ मिळाले पाहिजेत. नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर टप्पा अनुदान व अनुदानावर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. मान्यताप्राप्त शिक्षकांची नावे शालार्थमध्ये समाविष्ट झाली पाहिजेत आदी संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.