‘स्वीकृत’पासून खरे दावेदार दूरच
By admin | Published: August 23, 2015 04:36 AM2015-08-23T04:36:23+5:302015-08-23T04:36:23+5:30
प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यपदी निवड करताना सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जावी, असा नियम असताना
पिंपरी : प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यपदी निवड करताना सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जावी, असा नियम असताना, त्या नियमाला बगल देऊन राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली गेली आहे. एवढेच नव्हे, तर एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली गेली आहे. या पदासाठी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्तेच या पदाचे खरे दावेदार आहेत. राजकारण्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना या संधीपासून वंचित राहावे लागते आहे.
महापालिकेच्या ‘अ’ ‘ब’ ‘क’ ‘ड’ ‘ई’ आणि ‘फ’ या सहा प्रभागांमध्ये शुक्रवारी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी ११३ जण इच्छुक होते. प्रत्येक प्रभागात ३ या प्रमाणे सहा प्रभागांत एकूण १८ सदस्य निवडले गेले. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. साहजिकच प्रभाग समिती सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. प्रभाग अध्यक्षसुद्धा त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली गेली आहे. अन्य पक्षांचे कार्यकर्तेही या पदासाठी इच्छुकहोते. परंतु बहुमत राष्ट्रवादीचे असताना, दुसऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची डाळ शिजणार नाही, हे ओळखून इच्छा असूनही अनेकांनी स्वीकृत सदस्यपदासाठी हालचाल करणे टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकृत सदस्य पदावर संधी देताना, गटातटाचे राजकारण केले आहे.