जुन्या-नव्यांमध्ये पुन्हा वाद
By admin | Published: December 23, 2016 12:41 AM2016-12-23T00:41:10+5:302016-12-23T00:41:10+5:30
महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसे पक्षशिस्त आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने भारतीय
पिंपरी : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसे पक्षशिस्त आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांत अस्वस्थता वाढू लागली आहे. भोसरी मतदारसंघातील इच्छुकांना कॉर्पोरेट ट्रेनिंग देण्याचे आयोजन आमदार महेश लांडगे यांनी केले होते. मात्र, त्यात डावलल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांकडे दाद मागितली. या एककलमी कार्यक्रमाचा निषेध केला. संतप्त कार्यकर्त्यांना अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना शांत केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस इतर पक्षांतून अनेक नगरसेवक, पदाधिकारी भाजपात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपाचे जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. मागील आठवड्यात भाजपाच्या पक्ष कार्यालयात प्रोटोकॉल, नगरसेवक सक्षमता यावरून जुन्या-नव्यांत वाद झाला होता. त्यात कोणाची बाजू घ्यायची आणि कोणाला बोलायचे अशी द्विधा मन:स्थिती अध्यक्षांची झाली. त्यानंतर भोसरी मतदार संघातील प्रशिक्षणासंदर्भात जुन्या नव्यांवरून वाद झाला.(प्रतिनिधी)