दौऱ्यांबरोबर अहवालही बंधनकारक

By admin | Published: May 12, 2017 05:18 AM2017-05-12T05:18:16+5:302017-05-12T05:18:16+5:30

अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट केली जाते. अभ्यास दौऱ्यांचा विषय मंजूर करतानाच अभ्यास दौऱ्यांत सहभागी

The report is also mandatory for tourists | दौऱ्यांबरोबर अहवालही बंधनकारक

दौऱ्यांबरोबर अहवालही बंधनकारक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट केली जाते. अभ्यास दौऱ्यांचा विषय मंजूर करतानाच अभ्यास दौऱ्यांत सहभागी होणाऱ्यांनी अहवाल देणे आणि तो अहवाल सर्वसाधारण सभेसमोर मांडणे बंधनकार आहे, अशा सूचना स्थायी समितीने प्रशासनास केल्या आहेत.
सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. सभापटलावर ‘भागवत धमार्चा प्रसार व प्रचार व्हावा आणि वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण जनमाणसांना मिळावे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ’ टाळगाव चिखली येथे उभारण्याचा संकल्प केला आहे. संतपीठाचा अभ्यासक्रम आराखडा, त्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा, निवास-भोजनाची सोय, संतसाहित्य, वाङ्मयाची रचना, आदींची माहिती मिळविण्यासाठी पालिकेतर्फे अभ्यास दौरा आयोजित केला आहे. दिल्ली, हरिद्वारपासून ते कटक, ओडीसापर्यंत आयोजित अभ्यास दौऱ्यात आमदार, अतिरिक्त आयुक्तांसह बारा अभ्यासक सहभागी होणार आहेत. त्याच्या खर्चाला मंजुरी देण्याचा विषय स्थायी समितीच्या विषय पत्रिकेवर होता. त्याला मंजुरी देण्यात आली.

Web Title: The report is also mandatory for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.