वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीचा फेरप्रस्ताव
By admin | Published: March 20, 2017 04:25 AM2017-03-20T04:25:06+5:302017-03-20T04:25:06+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यआरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. अनिल रॉय यांना पदोन्नती देणे उचित ठरणार ठरणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यआरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. अनिल रॉय यांना पदोन्नती देणे उचित ठरणार ठरणार नाही, आरोग्य, वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवी यांच्या मागणीचा विचार करून पदोन्नती समितीने फेर प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना नगर विकास विभागाने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
महापालिका सभेने डॉ. अनिल रॉय यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवला होता. मात्र, पात्रता, सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक अर्हता लक्षात घेता डॉ. रॉय यांना पदोन्नती देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. पवन साळवी यांच्या प्रस्तावाचा विचार करत या दोघांच्या पात्रता पुन्हा पडताळाव्यात, त्यानंतरच पदोन्नतीचा योग्य तो निर्णय घ्यावा, अशा सूचना शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
यापुर्वीही डॉ. अनिल रॉय यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती दिली. या पदावरील तात्पुरत्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात येत आहे. मात्र, पालिकेने पुन्हा रॉय यांच्या नावाची शिफारस केल्याने फेरप्रस्ताव मागविला आहे.