आरक्षणामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले

By Admin | Published: January 24, 2017 01:41 AM2017-01-24T01:41:57+5:302017-01-24T01:41:57+5:30

नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गट हा औद्योगिक नगरीत असल्याने येथील गणात चुरशीची लढत होणार आहे. गटात अनुसूचित जमातीचे

Researchers have run away from their faces | आरक्षणामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले

आरक्षणामुळे इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले

googlenewsNext

चाकण : नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गट हा औद्योगिक नगरीत असल्याने येथील गणात चुरशीची लढत होणार आहे. गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण पडल्याने सर्वसाधारण इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत. शिवसेना वगळता इतर पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. नाणेकरवाडी गणात ओबीसी महिला व महाळुंगे गणात ओबीसी पुरुष आरक्षण असल्याने इच्छुक उमेदवारांनी कुणबी दाखले काढून जात पडताळणीसाठी धाव घेतली आहे.
या जिल्हा परिषद गटातून यापूर्वी विद्यमान आमदार सुरेश गोरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोनदा व मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर किरण मांजरे हे निवडून
गेले आहेत. गोरे सध्या शिवसेनेच्या गोटात असल्याने हा गड कोण राखणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या मानसुब्यांवर पाणी पडले आहे. आरक्षण पडल्याने वरच्या
उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी खालच्या उमेदवारांवर आली आहे. काही पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्तात ठेवले असून, अंतिम टप्प्यात नावे जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिनाभर
आधी प्रचार करूनही अंतिम क्षणी उमेदवारी बदलल्यास केलेल्या कष्टांवर पाणी पडणार आहे.
चाकणला नगर परिषद स्थापन झाल्याने या वेळी चाकण वगळून जिल्हा परिषद गट तयार झाला असून गणातील गावे विभागली आहेत. नाणेकरवाडी पंचायत समिती
गणात ओबीसी महिलेचे आरक्षण असून, त्यात नाणेकरवाडी, मेदनकरवाडी व कडाचीवाडी यांचा समावेश आहे. तर, महाळुंगे इंगळे गणात ओबीसी पुरुषाचे आरक्षण असून, त्यात खराबवाडी, महाळुंगे, खालूंब्रे, येलवाडी, सांगुर्डी व कान्हेवाडी तर्फे चाकण या गावांचा समावेश आहे.
या गटात शिवसेनेकडून नाणेकरवाडी येथील रूपाली श्रीकांत कड या तुल्यबळ दावेदार आहेत. भाजपाकडे या जागेसाठी
कुणाच्याही नावाची चर्चा नाही. महाळुंगे येथील माजी सरपंच दत्ता
गिरे हे इच्छुक असून, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी हवी आहे. नाणेकरवाडी पंचायत समिती गणामध्ये ओबीसी महिलेचे
आरक्षण आहे.
या गणात राष्ट्रवादीच्या
वैशाली गणेश जाधव यांना
शिवसेनेने खेचून आणले आहे. राष्ट्रवादीकडून सपना बलराम मेदनकर, अनुराधा सुभाष भुजबळ इच्छुक आहेत. दीपा संतोष नाणेकर, अश्विनी अंकुश नाणेकर याही इच्छुक आहेत. सुरेखा रामदास मेदनकर या भाजपाकडून इच्छुक आहेत. (वार्ताहर)

Web Title: Researchers have run away from their faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.