आरक्षणावरील बांधकामे पाडा - राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:17 AM2018-09-26T02:17:06+5:302018-09-26T02:17:18+5:30

महापालिका क्षेत्रातील मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. रस्ते, उद्याने, शाळा यांची आरक्षणे विकसित झालेली नाहीत.

 Reservation work on Padava - Rahul Jadhav | आरक्षणावरील बांधकामे पाडा - राहुल जाधव

आरक्षणावरील बांधकामे पाडा - राहुल जाधव

Next

पिंपरी : महापालिका क्षेत्रातील मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. रस्ते, उद्याने, शाळा यांची आरक्षणे विकसित झालेली नाहीत. आरक्षण विकासासाठी प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे डीपी रस्त्यातील अडथळा ठरणारी आरक्षणातील बांधकामे पाडावीत, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.
महापालिकेतील मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित झालेली नाहीत. याबाबत महापौरांनी आज आढावा घेतला. त्या वेळी समाविष्ट गावातील केवळ १० टक्के आणि इतर उपनगरात ५० टक्के आरक्षणे विकसित झाली आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली़ त्यावर महापौरांनी नाराजी व्यक्त केली. शहर परिसरात किती आरक्षणे आहेत आणि किती विकसित झाली. तसेच डीपी रस्त्यात किती बांधकामे अजूनही आहेत. त्या संदर्भात प्रशासनाने काय कार्यवाही केली. याबाबत दोन दिवसांत माहिती द्यावी, असे आदेश बांधकाम परवाना विभाग आणि नगररचना विभागास दिले आहेत.
महापौर जाधव म्हणाले,‘‘महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील अनेक डीपी रस्ते अपूर्ण आहेत. तसेच रस्त्यातील बांधकामे तशीच आहेत.

Web Title:  Reservation work on Padava - Rahul Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.