आॅनलाइन वीज बिल भरण्यास प्रतिसाद
By admin | Published: April 10, 2017 02:35 AM2017-04-10T02:35:25+5:302017-04-10T02:35:25+5:30
महावितरणच्या वीजबिलांची रक्कम आॅनलाइन भरण्यास पिंपरी व भोसरी विभागातील वीजग्राहकांचा मोठ्या
पिंपरी : महावितरणच्या वीजबिलांची रक्कम आॅनलाइन भरण्यास पिंपरी व भोसरी विभागातील वीजग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात पिंपरी व भोसरी विभागात १८ लाख ९८ हजार वीजग्राहकांनी महावितरणच्या मोबाइल अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तब्बल ३१२ कोटी १६ लाख रुपयांचा घसबसल्या भरणा केला आहे. २०१५-१६ या वर्षाच्या तुलनेत २०१६-१७ या वर्षी आॅनलाइन बिल जमा करणाऱ्यांची संख्या तब्बल पाच लाखांनी वाढली आहे.
आॅनलाइन सुविधेमुळे वीजबिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत नाही. केवळ एका क्लिकवर घरबसल्या बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पिंपरी, भोसरी विभागात २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण १३ लाख ९६ हजार वीजग्राहकांनी २२८ कोटी ६१ लाख रुपयांचा आॅनलाइन वीजबिल भरणा केला होता. तर सन २०१६-१७ या वर्षात १८ लाख ९८ हजार वीजग्राहकांनी ३१२ कोटी १६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात आॅनलाइन वीजभरणा करणाऱ्यांची संख्या पाच लाखांनी वाढ झाली असून, ८३ कोटी ५५ लाखांचा आॅनलाइन बिल भरणा वाढला आहे.
पुणे परिमंडलमध्ये आॅनलाइन वीजबिल भरण्यात पिंपरी विभाग आघाडीवर असून, गेल्या आर्थिक वर्षात पिंपरी विभागात १२ लाख ७७ हजार ग्राहकांनी १७२ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. तर भोसरी विभागात ६ लाख २१ हजार वीजग्राहकांनी १३९ कोटी ९६ लाख रुपयांचा ह्यआॅनलाइनह्ण वीजबिल भरणा केला आहे.
वीजग्राहकांना मुदतीत चालू देयकांचा, तसेच थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह संकेतस्थळ आणि अॅपची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय छापील कागदासह ई-मेलद्वारेही बिल मिळविण्याची सेवा उपलब्ध आहे. तसेच गो-ग्रीन अंतर्गत छापील कागदाऐवजी वीजबिलासाठी फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. याबाबतची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजबिलाचा आॅनलाइन भरणा करण्यासाठी क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेटबॅँकिंगचा पर्याय उपलब्ध असून वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक आॅनलाइन भरण्याची सोय उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)