खडकीत संपाला प्रतिसाद

By admin | Published: September 4, 2015 02:11 AM2015-09-04T02:11:28+5:302015-09-04T02:11:28+5:30

केंद्रीय कामगार संघटनांनी प्रस्तावित कायद्यातील बदलाच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपास खडकीतील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, ५१२ आर्मी बेस वर्कशॉप,

Response to rocky strips | खडकीत संपाला प्रतिसाद

खडकीत संपाला प्रतिसाद

Next

खडकी : केंद्रीय कामगार संघटनांनी प्रस्तावित कायद्यातील बदलाच्या विरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपास खडकीतील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, सीएएफ व डी डेपो, एमईएस व इतर अनेक सरंक्षण खात्यातील कामगारांनी संपात सहभाग नोंदवत प्रतिसाद दिला. भारतीय मजदूर संघाच्या (बीएमएस) कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली. ज्यांचा कुठल्याही प्रकारच्या संघटनांशी संबंध नसतो, असे कर्मचारी कामावर रुजू होताना पाहावयास मिळाले.
कामगारांनी प्रवेशदारासमोर उभे राहून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. संपाची दखल घेतली गेली नाही, तर २३ नोव्हेंबरपासून बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे. खडकीतील संपामध्ये बीएमएस वगळता विविध संघटना व पदाधिकारी सहभागी झाले. हनुमंत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली साईनाथ बालवडकर, राहुल नखाते, प्रशांत ढाले, गोपाल पिसे, हरीश भोईर, जीजो मॅथ्यू , संजय गभाले, राहुल रतुनावर, युनूस शेख, जमीर शेख आदींनी घोषणाबाजी केली.
किमान वेतन सूत्र बदलण्यात यावे, इंडियन लेबर कौन्सिल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान वेतन ठरविण्यात यावे. कामगार कायद्यात बदल करण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा करण्यात यावी. ट्रेड युनियन अ‍ॅक्टमध्ये बदल करण्यात येऊ नये, आदी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. कायद्यातील बदलामुळे कामगारांचे हक्कच काढून घेतले जाणार असल्याने त्यांना गुलामगिरीकडे ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप कामगार संघटना करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Response to rocky strips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.