विश्रांती कक्षाला टाळे, पिंपरी-चिंचवड एसटी आगार, आम्ही राहायचे कुठे? चालक-वाहकांचा प्रशासनाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:43 AM2017-10-20T02:43:51+5:302017-10-20T02:44:09+5:30

 The rest of the room, Pimpri-Chinchwad ST Depot, where do we live? Driver-carrier's administration question | विश्रांती कक्षाला टाळे, पिंपरी-चिंचवड एसटी आगार, आम्ही राहायचे कुठे? चालक-वाहकांचा प्रशासनाला सवाल

विश्रांती कक्षाला टाळे, पिंपरी-चिंचवड एसटी आगार, आम्ही राहायचे कुठे? चालक-वाहकांचा प्रशासनाला सवाल

Next

नेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून, तिसºया दिवशीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड आगारातील ३५० एसटी चालक-वाहकांना विश्रांती कक्षातून पोलीस बंदोबस्तासह बाहेर काढले. आता आम्ही राहायचे कुठे, असा सवाल चालक-वाहकांनी एसटी प्रशासनाला केला आहे.
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी मिळावी. इतर शासकीय कर्मचाºयांप्रमाणे एसटी कर्मचाºयांना सुविधा मिळाव्यात, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी. सन २००० पासून कनिष्ठ कामगारांना वेतनातील विसंगती दूर कराव्यात, १ एप्रिल २०१६ हंगामी वाढ सुरू करावी, जुलमी परिपत्रके व चालक कम वाहकाची संकल्पना त्वरित रद्द करावी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस ५०० रुपये भरून मोफत पास द्यावा, या सर्व मागण्यांकरिता हा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे.
सरकारने मागण्या मान्य न केल्याने राज्यव्यापी बेमुदत संप तिसºया दिवशीही सुरूच राहिला. एसटी महामंडळाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर मुख्य आगारातील संपात सहभागी चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षाला पुणे जिल्हा एसटी विभागीय कार्यालयाचे प्रमुख रविंद्र मोरे, आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या बंदोबस्तात टाळे ठोकण्यात आले. त्यामुळे उस्मानाबाद, लातूर, धुळे , बीड, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांतील आगारातील ३५० चालक-वाहकांना गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास सामानासह बाहेर काढल्यामुळे आगारात मोठा गोंधळ उडाला होता.
या वेळी आम्ही तुमच्या सर्व मागण्या वरिष्ठांकडे पाठवू, असे मोरे व भिसे यांनी सांगितले. आगारात कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरातील वल्लभनगर आगारामधील एकूण १३० एसटी बस तीन दिवसांपासून जागेवरच उभ्या असल्यामुळे गावाकडे जाण्यासाठी नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. संपामुळे अनेकांना नाइलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्याकरिता त्यांना नेहमीच्या दरापेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागत असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. हा संप संपणार कधी, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
अनेकांनी आरक्षण रद्द केल्यामुळे मोठा आर्थिक फटका आगाराला बसला असून, गुरुवारअखेर तीन दिवसांचे ४५ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती भिसे यांनी दिली.

शांततेने नोंदविला निषेध
या वेळी अनेक चालक-वाहकांनी, विश्रांतीकक्षाला टाळे ठोकण्याचा लेखी आदेश दाखवा, आम्ही राहायचे कुठे, ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्हाला आगारामधील विश्रांती कक्षाबाहेर काढले, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे चालक-वाहकांनी आगारप्रमुखांना सुनावले. अनेक चालक-वाहकांनी डोक्यावर आपले सामान घेऊन आगारात फेरी काढून याचा शांततेने निषेध देखील नोंदवला.

आगारात तणावाचे वातावरण
आगारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पुणे जिल्हा एसटी विभागीय कार्यालयाचे प्रमुख रवींद्र मोरे, आगार व्यवस्थापक अनिल भिसे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, वल्लभनगर आगार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मोहिते, सचिव हरिभाऊ जाधव, काही चालक-वाहक यांच्यात एक बैठकदेखील झाली. या बैठकीमध्ये तासभर चर्चा झाली. या वेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या मागण्या मांडल्या.

ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल

वडगाव मावळ : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाºयांनी केलेल्या संपामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत.एसटीअभावी प्रवाशांना तासन्तास खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांची वाट पाहावी लागत आहे. मावळ तालुक्यात ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी हे एकमेव साधन असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. दिवाळीच्या सुटीत तालुक्यातील कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक सुटीमध्ये आपापल्या गावी येत असतात. परंतु गावी जाण्यासाठी एसटी बस नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागत आहे.
मोर्वे, चावसर, तुंग, खांडी, कसूर यांसारख्या ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी एसटी हाच पर्याय आहे. वडगावपासून ही सर्व गावे ४० ते ५० किलोमीटरच्या अंतरावर आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी प्रामुख्याने एसटीचा वापर केला जातो. परंतु एसटी कर्मचाºयांनी संप केल्यामुळे या गावातील प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली आहे. याच परिसरातील नागरिक उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. ते दिवाळीच्या सुटीत आठ-दहा दिवसांसाठी गावी येत असतात.
४आपल्या गावात जाण्यासाठी एसटी हा एकमेव मार्ग असल्याने आणि एसटी कर्मचाºयांनी संप केल्याने या भागातील नागरिकांनी गावी न येणेच पसंत केले आहे. एसटी बंदचा फटका कामशेत, तळेगाव दाभाडे,वडगाव, लोणावळा या महत्त्वाच्या बाजारपेठांवरदेखील पडला आहे. एसटी सेवा बंद असल्याने नागरिकांना घरातून बाहेर खरेदीसाठी येण्यास विलंब लागत असल्यामुळे बाजारपेठेत देखील ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणाºयांची दिवाळी
एसटी कर्मचाºयांनी संप पुकारल्यामुळे मावळ तालुक्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालकांची दिवाळी गोड झाली आहे. पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ या भागातील अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने भरगच्च भरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाताना दिसत आहेत. नागरिकांनाही सणासुदीच्या दिवसांत लवकर घरी जाणे पसंत असल्यामुळे तेदेखील जोखीम पत्करून अशा वाहनात प्रवास करताना दिसत आहेत.

Web Title:  The rest of the room, Pimpri-Chinchwad ST Depot, where do we live? Driver-carrier's administration question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.