‘आवाज कुणाचा’वर आणणार लगाम

By admin | Published: January 25, 2017 01:59 AM2017-01-25T01:59:51+5:302017-01-25T01:59:51+5:30

महापालिका निवडणुकांसाठी लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रचाराचा खरा नारळ फुटणार आहे.

Restricting the 'voice' | ‘आवाज कुणाचा’वर आणणार लगाम

‘आवाज कुणाचा’वर आणणार लगाम

Next

पिंपरी : महापालिका निवडणुकांसाठी लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रचाराचा खरा नारळ फुटणार आहे. प्रचारात ध्वनिक्षेपकांचा आवर्जून वापर केला जातो; पण या निवडणुकीत ध्वनिप्रदूषणाला लगाम घालण्यासाठी प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. प्रसंगी कारवाईचे संकेतही निवडणूक विभागाने दिले आहेत.
ध्वनिवर्धकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत वा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्री १० वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याशिवाय वापर करता येणार नाही.
याबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शिवाय, स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षितता आणि गरजेचा स्थानिक दृष्टिकोन तथा हवामान, सण व परीक्षांचा काळ लक्षात घेऊन ध्वनिक्षेपकांचा वापर करावा लागणार आहे. निवडणूक प्रचारासाठी वाहनांवर ध्वनिक्षेपके लावून प्रचार केला जातो. अनेकदा फिरती वाहने सर्वांकरिताच डोकेदुखी ठरत असतात. महापालिका निवडणुकीमध्ये कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Restricting the 'voice'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.