हौशी चालकांमुळे आरटीओची कोटींची उड्डाणे, ‘चॉईस नंबर’मधून महसूलप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 01:38 AM2018-12-27T01:38:44+5:302018-12-27T01:39:27+5:30

नवीन दुचाकी व चारचाकी वाहन घेतले, तर आवडीचा नंबर मिळावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. काही हौशी वाहनचालक वाहनाच्या किमतीइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक पैसे पसंतीच्या क्रमांकाला मोजतात.

 Revenue receipts from RTOs due to amateur drivers, 'Choice Number' Revenue | हौशी चालकांमुळे आरटीओची कोटींची उड्डाणे, ‘चॉईस नंबर’मधून महसूलप्राप्ती

हौशी चालकांमुळे आरटीओची कोटींची उड्डाणे, ‘चॉईस नंबर’मधून महसूलप्राप्ती

Next

- प्रकाश गायकर
पिंपरी : नवीन दुचाकी व चारचाकी वाहन घेतले, तर आवडीचा नंबर मिळावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. काही हौशी वाहनचालक वाहनाच्या किमतीइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक पैसे पसंतीच्या क्रमांकाला मोजतात. या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये ११ कोटी ८३ लाख ५० हजार रुपये इतका महसूल उपप्रादेशिक कार्यालयाच्या (आरटीओ) तिजोरीत जमा झाला आहे.
आवडीचा वाहन क्रमांक घेणाऱ्यांमध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. त्यासाठी जादा पैसे मोजण्याची तयारीही वाहनमालक दाखवत आहे. काही दुचाकीमालकही आवडीच्या नंबरसाठी जादा पैसे मोजतात.
या आकर्षक नंबरसाठी २० ते ३० हजार रुपये ते खर्च करतात. हौसेला मोल नसते या उक्तीप्रमाणे वाहनचालकांच्या हौसेपोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल आरटीओमध्ये जमा होत आहे.
मुहूर्तावर सर्वाधिक महसूल
आॅक्टोबर (दसरा) आणि नोव्हेंबरमध्ये (दिवाळी) सर्वाधिक महसूल जमा झाला आहे. आॅक्टोबरमध्ये १ कोटी ७६ लाख ५८ हजार ५००, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये १ कोटी १० लाख ७९ हजार ५०० इतका महसूल चॉईस नंबरमधून जमा झाला आहे. आॅक्टोबर महिन्यामध्ये २०५४ जणांनी चॉईस नंबरसाठी अर्ज केला होता. जानेवारी महिन्यामध्ये कमी म्हणजे ५६ लाख ९२ हजार ५०० रुपये महसूल जमा झाला. चॉईस नंबरमुळे तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर पडली

आपल्या वाहनाचा नंबर आकर्षक असावा, वाहन क्रमांकातून ठरावीक तारीख ध्यानात यावी, तसेच अमुक एखादा नंबर ‘लकी’ आहे, या समजुतीतून ‘चॉईस नंबर’ घेतला जातो. त्यासाठी वाहनाच्या किमतीपेक्षाही जास्त किंमत मोजण्यास वाहनमालक तयार होतात. - आनंद पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

४७४७, ४९१२ अशा क्रमांकासाठी ५० हजार रुपये मोजले जातात. ०००१ या क्रमांकासाठी तर सात लाख रुपये मोजण्यात आले आहेत. सर्वाधिक पसंतीच्या क्रमांकांमध्ये ९००, ०९९९, ७७७७ यांचा समावेश आहे. त्यासाठी वाहनचालक किमान दोन लाख रुपये खर्च करीत आहेत.

Web Title:  Revenue receipts from RTOs due to amateur drivers, 'Choice Number' Revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.