एकशे वीस कोटींचा सुधारित निधी, उपसूचनांचे वाचन न करताच दिली मंजुरी; विरोधकांनी सत्ताधा-यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:07 AM2017-11-30T03:07:03+5:302017-11-30T03:07:19+5:30
साई मंदिर, कोतवालवाडी, च-होली गावठाण, वडमुखवाडी, सर्व्हे क्रमांक ५१९ ते ४५७पर्यंतचा ३० मीटर विकास आराखड्यातील रस्ता, चोविसावाडी आणि वडमुखवाडीतील १८ मीटर रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
महापौरांच्या प्रभागात १०० कोटी
साई मंदिर, कोतवालवाडी, च-होली गावठाण, वडमुखवाडी, सर्व्हे क्रमांक ५१९ ते ४५७पर्यंतचा ३० मीटर विकास आराखड्यातील रस्ता, चोविसावाडी आणि वडमुखवाडीतील १८ मीटर रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एकूण १९ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता होती. या कामांसाठी उपसूचनेद्वारे तब्बल ८५ कोटी रुपयांची सुधारित वाढीव प्रशासकीय मान्यता दिली. पिंपळे गुरव येथील दापोडी पूल ते तुळजाभवानी मंदिर ते सृष्टी चौकापर्यंतच्या १८ मीटर रुंद रस्त्याच्या नूतनीकरणास १० कोटी प्रशासकीय मान्यता आहे. मात्र, या कामाला २० कोटी रुपये वाढीव मान्यता दिली.
असा आहे वाढीव निधी...
थेरगावातील विकास आराखड्यातील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी मूळ अर्थसंकल्पीय रक्कम तीन कोटी होती. त्यामध्ये एक कोटी वाढ करून चार कोटींची सुधारित मान्यता दिली.
चिंचवड, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगरात नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. या कामाचा आदेश गेल्या वर्षी दिला होता. प्रभागरचना बदलल्याने भाटनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरी या भागात पाण्याच्या समस्या असल्याने पाइपलाइन टाकण्याची आवश्यकता
आहे. त्यामुळे जुन्या कामातून या भागात
नवीन पाइपलाइन टाकण्याची उपसूचना
मंजूर केली.
भक्ती-शक्ती चौक ते किवळे-मुकाई
चौक बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये शिंदेवस्ती येथे उड्डाणपुलातील अडथळा ठरणाºया वाहिन्या हटविण्यासाठी पाच कोटींची रक्कम होती. ती रक्कम ७ कोटी रुपये करण्यास मान्यता दिली.
चºहोली, मोशी येथील विकासकामांची मूळ अर्थसंकल्पातील जागा बदल करून काम करण्यास मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार भोसलेवस्ती ते पठारेमळा १८ मीटर रस्त्यासंदर्भातील कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ९५ लाख रुपये होती. त्याऐवजी प्रभागातील विविध ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक व स्थापत्यविषयक काम करण्यात येणार आहेत.
चºहोली फाटा रस्ता ते चोविसावाडी, वडमुखवाडी १८ मीटर रस्ता विकसित करण्यासाठी २३ लाख रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता असून, मोशीतील डुडुळगाव-केळगाव पुलासाठी विकास आराखड्यातील रस्ता तयार होणार असून, त्यासाठी ७५ लाख रुपये, तर चºहोली ते डी. वाय. पाटील कॉलेजपर्यंतचा ३० मीटर रुंदीचा रस्ता डांबरीकरणासाठी ८५ लाख रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता आहे.