नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या प्रमाणपत्राची पुनर्तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:07 AM2018-10-12T04:07:14+5:302018-10-12T04:07:24+5:30
महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय बुलडाणा जात प्रमाणपत्र समितीने घेतला. या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
पिंपरी : महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय बुलडाणा जात प्रमाणपत्र समितीने घेतला. या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने पडताळणी समितीला दिले असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक गायकवाड यांचे प्रमाणपत्र दोनदा रद्द केल्याचा निर्णय पडताळणी समितीने घेतल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. पडताळणी समितीच्या निर्णयाला गायकवाड यांनी आव्हान देणारी याचिका नागपूरला दाखल केली होती. त्याबाबतची माहिती गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. या वेळी महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित होते.
बुलडाणा समितीच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर पडताळणी समितीच्या निर्णयाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली.
- कुंदन गायकवाड, नगरसेवक
नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे
पद रद्द केल्याची माहिती शासनाकडे पाठविली आहे. दरम्यान, आज त्यांनी न्यायालय आदेशाची प्रत आणून दिली आहे. या संदर्भातील कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त